शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा रुग्णालयाच्या प्रसूतीपश्चात वॉर्डात पसरलीय भयाण शांतता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2021 02:08 IST

विशेष नवजात अतिदक्षता कक्षालगतच हे दोन प्रसूतीपश्चात वॉर्ड आहेत. या वॉर्डात त्या रात्री ३४ प्रसूती झालेल्या महिला आपल्या चिमुकल्यांसह झोपल्या होत्या

ज्ञानेश्वर मुंदे

भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निकांडाला पाच दिवस उलटले तरी प्रसूतीपश्चात वॉर्डात अद्यापही भयाण शांतता आहे. एक वॉर्ड रिकामा करून लगतच्या वॉर्डात सर्व मातांना ठेवण्यात आले असून, त्यांच्या डोळ्यात बाळाच्या सुरक्षेची भीती स्पष्टपणे दिसून येते. मोजकेच अधिकारी आणि परिचारिका येथे कर्तव्य बजावताना दिसतात.  

विशेष नवजात अतिदक्षता कक्षालगतच हे दोन प्रसूतीपश्चात वॉर्ड आहेत. या वॉर्डात त्या रात्री ३४ प्रसूती झालेल्या महिला आपल्या चिमुकल्यांसह झोपल्या होत्या. घटनेनंतर वॉर्ड क्रमांक ६ रिकामा करण्यात आला असून, ३४ नवजात बालके आणि मातांना ताबडतोब सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. आता या मातांची व चिमुकल्यांची व्यवस्था वॉर्ड क्रमांक ७ मध्ये करण्यात आली आहे. पाच दिवस लोटूनही या दोनही वॉर्डांत भयाण शांतता दिसत आहे. वॉर्ड क्रमांक ६ मधील सर्व बेड ओस पडलेले आहेत. 

पाच दिवसांत ६५ बाळांचा जन्मn रुग्णालयात अग्नितांडवानंतरच्या पाच दिवसांत ६५ बाळांनी जन्म घेतला. त्यात आकस्मिक वॉर्ड, इलेक्टिव्ह विभाग - वॉर्ड क्रमांक ६ व ७ मध्ये जन्मलेल्या बाळांचा समावेश आहे. n शनिवार, ९ जानेवारी ते १३ जानेवारी दुपारी ३ वाजेपर्यंत बाळांच्या जन्माची नोंद आहे. घटनेच्या दिवशी प्रसूतीसाठी आठ गर्भवतींना दाखल करण्यात आले होते.  n त्या दिवशी सहा मुली आणि दोन मुलांचा जन्म झाला. रुग्णालयाची घडी विस्कटली असल्याने योग्य उपचार होत नसल्याची खंत काही मातांनी व्यक्त केली. 

बचावलेली सात बालके तात्पुरत्या कक्षात भीषण अग्निकांडात बचावलेल्या सात नवजात बाळांसाठी कुटुंब कल्याण विभागाच्या कक्षात तात्पुरत्या तयार करण्यात आलेल्या एसएनसीयू कक्षात हलविण्यात आले आहे. तेथे या सात बालकांवर विशेष उपचार केले जात असून, सर्वांची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Bhandara Fireभंडारा आगDeathमृत्यू