सिहोऱ्यात वन्यप्राण्यांची भीती
By Admin | Updated: August 8, 2015 00:41 IST2015-08-08T00:41:24+5:302015-08-08T00:41:24+5:30
ग्रीन व्हॅली चांदपुरच्या राखीव जंगलात वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.

सिहोऱ्यात वन्यप्राण्यांची भीती
वाघाच्या हल्ल्यात बैल ठार : बिनाखीत रानडुकरांच्या हल्ल्यात महिला जखमी
चुल्हाड (सिहोरा) : ग्रीन व्हॅली चांदपुरच्या राखीव जंगलात वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. सोंड्या गावात वाघांच्या हल्ल्यात बैल ठार झाला असून बिनाखी गावात रानडुकरांच्या महिला जखमी झाली आहे. यामुळे शेत शिवारात रोवणीचे कामे करणारी शेतकरी आणि मजूर भयभीत झाले आहेत.
सिहोरा परिसरात ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटन स्थळात राखीव जंगल आहे. या जंगलात वन्य तथा हिंस्त्र प्राण्याचा मुक्त संचार आहे. या प्राण्यांपासून सावधगिरीचा इशारा देत वन विभागामार्फत जंगलात भ्रमंती करण्यास बंदी घातली आहे. या आशयाचे फलक लावण्यात आले आहे. परंतु या सूचना फलकांचे जंगलात प्रेमीयुगूल, पर्यटक तथा गावकरी पालण करीत नाही. यामुळे त्यांचे जीव धोक्यात आले आहे. मंगळवारला रोवणी आटोपल्याने सोंड्या गावातील शेतकरी राजाराम लंजे यांनी दोन बैलांना चराईकरिता शेतशिवार लगत जंगलात सोडले. कम्पार्टमेंट १० मध्ये बैल चारात असतांना एका बैलावर वाघाने हल्ला केला असता यात जागीच या बैलाचा मृत्यू झाला.
तर शेतकऱ्याने आरडाओरड करताच शेतावर काम करणारी मजुरी धावून आले. यामुळे वाघ ग्रीन व्हॅली चांदपूरच्या दिशेने पळुन गेला. या हल्ल्याची सूचना वनविभागात कार्यरत कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे.
दुसऱ्या घटनेत बिनाखी गावात दुपारी १२च्या सुमारास शेत शिवारात रोवणीचे कामे करीत असताना पुश्वंता कटरे (६५) या महिलेवर रानडुकराने हल्ला केला असता, यात जखमी झाले आहेत. (वार्ताहर)