आंतरजिल्हा बदली अन्यायग्रस्त शिक्षकांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 22:44 IST2018-06-04T22:44:22+5:302018-06-04T22:44:55+5:30
उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे विभागीय आयुक्तांनी घेतलेल्या सुनावणी तसेच चौकशी समितीसमोरील बयानानुसारच्या निष्कर्षाप्रमाणे २३ नोव्हेंबर २०१६ ला आंतर जिल्हा बदलीने जिल्हा परिषद भंडारा येथे बदलून आलेल्या ११७ प्राथमिक शिक्षकांच्या नियमबाह्य झालेल्या बदल्या रद्द करण्यात याव्यात. यासह अन्य मागण्यांसाठी प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने सोमवारपासून जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणाला प्रारंभ करण्यात आलेला आहे.

आंतरजिल्हा बदली अन्यायग्रस्त शिक्षकांचे उपोषण
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे विभागीय आयुक्तांनी घेतलेल्या सुनावणी तसेच चौकशी समितीसमोरील बयानानुसारच्या निष्कर्षाप्रमाणे २३ नोव्हेंबर २०१६ ला आंतर जिल्हा बदलीने जिल्हा परिषद भंडारा येथे बदलून आलेल्या ११७ प्राथमिक शिक्षकांच्या नियमबाह्य झालेल्या बदल्या रद्द करण्यात याव्यात. यासह अन्य मागण्यांसाठी प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने सोमवारपासून जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणाला प्रारंभ करण्यात आलेला आहे.
आंतरजिल्हा बदली अन्यायग्रस्त शिक्षकांवर अनेक वर्षांपासून अन्याय होत आहे. त्यांना आश्वासनाखेरीज काहीच मिळाले नाही. परिणामी त्यांनी कुटुंबासमवेत आमरण उपोषणाचा इशारा शासन प्रशासनाला दिला होता. आंतरजिल्हा बदलीने नियमबाह्यरित्या बदलीने नियुक्त केलेल्या शिक्षकांमुळे वंचित राहिलेल्या पात्र शिक्षकांना न्याय देण्यासाठी जिल्हा परिषदने योग्य ती कारवाई करून अन्यायग्रस्तांना त्वरीत पदस्थापना देण्यात यावी, नियमबाह्य बदली प्रकरणातील ११७ शिक्षकांच्या बदल्यांमध्ये अनियमितता करणाऱ्या तत्कालीन प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावे, सन २०१८ मध्ये जिल्हा परिषदमध्ये अनेक पदे रिक्त असताना केवळ दोन पदे आॅनलाईन पद्धतीने भरण्यात आले. त्यामुळे उर्वरित पदांवर विशेषबाब अंतर्गत बदली देण्यास्तव प्रशासनाने तातडीने कारवाई करण्यात यावे, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. मागण्यांची पुर्तता न झाल्यास उपोषण चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उपोषणात नितीन हटवार, मनोहर कहालकर, शशिकांत वसू, राकेश शेबे, राजेश गिरीपुंजे, राजकुमार टेंभुर्णे, संतोष ढगे आदी शिक्षक सहभागी