समस्या निराकरणासाठी उपोषणाचा इशारा
By Admin | Updated: May 27, 2014 23:29 IST2014-05-27T23:29:23+5:302014-05-27T23:29:23+5:30
रस्ता रुंदीकरण दरम्यान ठाणा-खरबी नाका येथील रहदारीचा रस्ता, सांडपाण्याची नाली आदी कामे संबंधित कंत्राटदाराने बांधकाम करुन दिलेले नाही. परिणामी ग्रामस्थांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

समस्या निराकरणासाठी उपोषणाचा इशारा
जवाहरनगर : रस्ता रुंदीकरण दरम्यान ठाणा-खरबी नाका येथील रहदारीचा रस्ता, सांडपाण्याची नाली आदी कामे संबंधित कंत्राटदाराने बांधकाम करुन दिलेले नाही. परिणामी ग्रामस्थांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. संबंधित अधिकार्यांच्या दुर्लक्षित धोरणाच्या निषेधार्थ ग्रामपंचायत ठाणा (पे.पंप) येथील पदाधिकारी व सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा निवेदनातून दिला आहे. मुजबी ते पारडी नाकापर्यंत रस्ता रुंदीकरणाचे काम ९0 टक्के आटोपल्यात आहे. ठाणा पे.पंप व खरबी नाका ग्रामपंचायत यांनी रस्ता रुंदीकरणामुळे पिण्याच्या पाण्याची सोय, रहदारी व सांडपाणी प्रभावित झालेली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी दिलीप बिलकॉम व्यवस्थापकास प्रत्यक्ष व लेखी समस्येचे निराकरण करण्यासाठी सांगण्यात आले. मात्र वर्षे लोटून गेले गावातील समस्या जसास तसे पडून आहे. यात खरबी नाका येथील रहदारीमधील दोन्ही बाजूकडील सांडपाणी विल्हेवाटकरीता नाल्यांची व्यवस्था, रहदारीकरीता दोन्ही बाजूने रस्त्याचे बांधकाम तात्काळ सुरु करणे, ठाणा पे.पंप ग्रामपंचायत अंतर्गत महामार्गाच्या दुतर्फा रहदारीमधील सांडपाणी व महामार्गावरील पावसाचे पाणी हे पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून गाव तलावात न सोडता, गावालगत असलेल्या नाल्यामध्ये सोडण्यात यावे, जेणेकरुन तलावातील पाणी दुषित होणार नाही. रस्ता रुंदीकरणात चार बोअरवेल निकामी झाले. परिणामी पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. प्रस्तावित स्थळी नवीन हातपंप तयार करण्यात याव्यात याविषयी ठाणा ग्रामपंचायतने मागील काळात वारंवार प्रत्यक्ष भेट घेऊन व लेखी निवेदन देण्यात आले. ठाणा स्मशानभूमी रस्ता तयार करण्यात आले नाही. वर्ष लोटून गेले. परंतु कामे काही करण्यात आलेली नाही. यांच्या निषेधार्थ ग्रामपंचायत ठाणा येथील पदाधिकारी व सदस्या यांनी काल दि.२६ मे रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. समस्यांचे निराकरण न झाल्यास दि. २९ मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. (वार्ताहर)