ऊसाच्या चुकाऱ्यांसाठी उपोषणाचा इशारा

By Admin | Updated: September 1, 2014 23:20 IST2014-09-01T23:20:38+5:302014-09-01T23:20:38+5:30

वैनगंगा शुगर अँड पावर लिमिटेड देव्हाडाचे उपाध्यक्ष यांनी लेखी आश्वासन देऊनही उसाचे चुकारे दिले नाही. परिणामी ऊस उत्पादक शेतकरी आजपासून वैनगंगा शुगर अँड पावर लिमिटेड देव्हाडाचे शाखा

Fasting gestures for sugarcane growers | ऊसाच्या चुकाऱ्यांसाठी उपोषणाचा इशारा

ऊसाच्या चुकाऱ्यांसाठी उपोषणाचा इशारा

साकोली : वैनगंगा शुगर अँड पावर लिमिटेड देव्हाडाचे उपाध्यक्ष यांनी लेखी आश्वासन देऊनही उसाचे चुकारे दिले नाही. परिणामी ऊस उत्पादक शेतकरी आजपासून वैनगंगा शुगर अँड पावर लिमिटेड देव्हाडाचे शाखा कार्यालय सेंदूरवाफा समोर उपपोषणाला बसणार असे निवेदन पीडित शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशन साकोली येथे दिले आहे.
या निवेदनानुसार दि. १२ आॅगस्ट रोजी पिडीत शेतकऱ्यांनी शाखा कार्यालय सेंदूरवाफा येथे येऊन उसाचे चुकारे मागितले असता वैनगंगा शुगर अँड पावर लिमिटेड देव्हाडाचे उपाध्यक्ष श्रीराम दादा टिचकुले यांनी पीडित शेतकऱ्यांना दि. ३१ आॅगस्टपर्यंत बाकी असलेले संपूर्ण चुकारे देऊ असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र उपाध्यक्ष टिचकुले यांनी आश्वासनाप्रमाणे दि. ३१ आॅगस्टला बाकी असलेले चुकारे दिले नाही. त्यामुळे पिडीत शेतकरी उद्या दि. २ ला सकाळी १० वाजतापासून वैनगंगा शुगर अँड पावर लिमीटेड देव्हाडाचे शाखा कार्यालय सेंदूरवाफा येथे उपोषणाला बसणार आहे. या निवेदनाच्या प्रतिलिपी पिडीत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी भंडारा, उपविभागीय अधिकारी पोलीस स्टेशन साकोली, साखर सहसंचालक नागपूर, साखर आयुक्त पुणे यांना पाठविल्या आहेत. या निवेदनावर ५७ शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Fasting gestures for sugarcane growers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.