अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण

By Admin | Updated: January 1, 2017 00:59 IST2017-01-01T00:59:45+5:302017-01-01T00:59:45+5:30

पिंपळगाव (नि.) येथील हनुमान वॉर्ड क्रमांक २ येथील दलित वस्ती सिमेंट रस्त्यावर संतोष श्रीराम सुखदेवे, भैरव ताराचंद वाहणे, ...

Fasteners' fasting demand for removal of encroachment | अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण

अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण

 प्रकरण पिंपळगांव येथील : वाहतुकीला अडथळा, ग्रामपंचायतचे दुर्लक्ष
चिचाळ : पिंपळगाव (नि.) येथील हनुमान वॉर्ड क्रमांक २ येथील दलित वस्ती सिमेंट रस्त्यावर संतोष श्रीराम सुखदेवे, भैरव ताराचंद वाहणे, रामाजी हिरामण मेश्राम व सकवार विठोबा उके यांचे अतिक्रमण रस्त्यावर आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. संबंधित विभागाला दोन वर्षापासून निवेदने देवूनही कानाडोळा करीत आहे. संबंधित अतिक्रमण तात्काळ हटवा यासाठी अन्नपूर्णा जयप्रकाश मेश्राम यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
पवनी तालुक्यातील पोलीस स्टेशन अड्याळ हद्दीतील पिंपळगाव येथील गावठाण हद्दीतील दलित वस्तीमध्ये जाणाऱ्या मुख्य मार्गावर संतोष सुखदेवे यांचे शौचालय, भैरव वाहणे यांच्या घराचा वऱ्हांडा व टिनपत्रे, रामजी मेश्राम यांच्या घराची पायरी व टिनपत्रे रस्त्यावर आल्याने बैलबंडीला अडथळा निर्माण होत असून कित्येकदा शाब्दीक खडाजंगी होत असते.
सदर वार्डातील लोकांनी गेल्या दोन वर्षापासून ग्रामपंचायत व जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिले व त्यासंबंधी हेलपाट्या मारूनही शासन उडवाउडवीचे उत्तरे देवून कागद समोर ढकलण्याचा प्रकार सुरू आहे. तर काही शासकीय अधिकारी हे आमचे काम नाही, असे म्हणून गेल्या दोन वर्षापासून सदर प्रकरणाकडे कानाडोळा करीत आहेत.
सदर वार्डवासीयांनी अतिक्रमण संदर्भात विभागीय आयुक्त नागपूर, जिल्हाधिकारी भंडारा, मुख्य कार्यपालन अधिकारी पवनी, तहसीलदार पवनी यांना निवेदन देवूनही कोणतीच कारवाही होत नसल्याने अखेर त्रस्त झालेल्या वार्डावासीयांनी ग्रामपंचायतीसमोर अन्नपूर्णा मेश्राम यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
उपोषणकर्त्या अन्नपुर्णा मेश्राम यांनी, जोपर्यंत समस्या मार्गी लागणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असे ‘लोकमत’ प्रतिनिधीजवळ सांगितले. उपोषण मंडपाला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मुनिर शेख यांनी भेट दिली.
यावेळी राजकुमार मेश्राम, पंढरी बोरकर, आसाराम सुखदेवे, सकवार उके, अनुसया सुखदेवे, नरेंद्र येळणे, गजानन सेलोकर आदी उपस्थित होते.
(वार्ताहर)

 

Web Title: Fasteners' fasting demand for removal of encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.