निकालाची गाडी फास्ट !

By Admin | Updated: January 8, 2015 22:49 IST2015-01-08T22:49:52+5:302015-01-08T22:49:52+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांंचे आतापर्यंत ३७ टक्के निकाल घोषित झाले आहेत. लवकरात लवकर निकाल लावण्यासाठी विद्यापीठा प्रशासनाने कंबर कसली आहे.

Fast drive train! | निकालाची गाडी फास्ट !

निकालाची गाडी फास्ट !

भंडारा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांंचे आतापर्यंत ३७ टक्के निकाल घोषित झाले आहेत. लवकरात लवकर निकाल लावण्यासाठी विद्यापीठा प्रशासनाने कंबर कसली आहे.
विद्यापीठाकडून ८३५ अभ्यासक्रमांच्या हिवाळी परीक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या. यातील ३१६ परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. पहिल्या टप्प्यात ८४, दुसऱ्यात ३१३ व तृतीय टप्प्यात २७४ अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात आल्या. आतापर्यंत पहिल्या टप्प्याचे ३७, दुसऱ्यातील २२४ तर तिसऱ्या टप्प्यातील ३५ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा ११ दिवसांकरिता ‘पोस्टपोन’ करण्यात आल्या होत्या हे विशेष. उन्हाळी परीक्षांचे निकाल घोषित करण्यात विद्यापीठाला ४५ ते १२० दिवसांचा कालावधी लागला होता. पुढील दोन आठवड्यात जास्तीतजास्त अभ्यासक्रमांचे निकाल घोषित करण्याचे परीक्षा विभागाचे प्रयत्न राहणार आहेत. अनेक अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पूर्णत्वास पोहोचले आहे, अशी माहिती परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Fast drive train!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.