शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

शेततळ्यांची कामे फक्त १२ टक्के

By admin | Updated: March 10, 2017 01:27 IST

मागेल त्याला शेततळे अंतर्गत राबविण्यात आलेल्या योजनेत जिल्ह्यात फक्त १२ टक्केच शेततळ्यांची बांधणी झालेली आहे.

४० लक्ष रूपयांचा खर्च : पिचिंग व फलकाची कामे अर्धवटइंद्रपाल कटकवार  भंडारामागेल त्याला शेततळे अंतर्गत राबविण्यात आलेल्या योजनेत जिल्ह्यात फक्त १२ टक्केच शेततळ्यांची बांधणी झालेली आहे. विशेष म्हणजे यावर ४० लक्ष ७७ हजार रुपयांचा खर्च झाला असून २०० कामे प्रगतीपथावर आहे. जिल्ह्यातील सिंचन सुविधांची स्थिती पाहता यात सुधारणा होणे अत्यंत गरजेचे आहे. शासनाच्या कृषी विभागामार्फत मागेल त्याला शेततळे ही योजना राबविली जाते. जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालय ते तालुका कृषी कार्यालयापर्यंत या योजनेची माहिती संबंधित शेतकऱ्यांपर्यंत किंवा लाभार्थ्यांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे.याकरिता हजारो रुपयांचा निधी खर्च होत असला तरी ग्रामीण भागात विशेषत: शेततळ्यांच्या योजनेबाबत लाभार्थ्यांमध्ये उदासिनता दिसून येते.जिल्ह्यातील सातही तालुके मिळून १२०० शेततळी बांधण्याचा लक्षांक देण्यात आला आहे. यात कालावधी जास्त असला तरी अर्ज संख्या १४४७ अशी होती. यापैकी पात्र अर्जांची संख्या १३३१ एवढी होती. निकषानुसार १२७८ शेतकरी पात्र ठरली. परंतु तांत्रिक दृष्ट्या १०८८ शेतकऱ्यांना ही योजना पात्र ठरविण्यात आली. पात्र ठरलेल्या शेततळ्यांच्या बांधकामांतर्गत ९०३ शेततळ्यांच्या बांधकामासाठी कार्यारंभ आदेश देण्यात आला. यापैकी आखणी करुन ८५६ शेततळ्यांची निर्मिती करण्यावर भर देण्यात आला होता. यापैकी २०० शेततळ्यांची कामे प्रगतीपथावर असून १०४ कामे पूर्ण झाली आहेत. शेततळी पूर्ण झालेल्या व अनुदान दिलेल्या लाभार्थ्यांची संख्या ८८ इतकी आहे. भंडारा तालुक्यात ६, मोहाडी २२, तुमसर ६, पवनी ३, साकोली २०, लाखनी ४५ तर लाखांदूर तालुक्यात २ शेततळ्यांची कामे पूर्ण झालेली आहेत. या कामासाठी ४० लक्ष ७७ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला.