शेतकऱ्यांना निधीची कमतरता भासणार नाही

By Admin | Updated: August 25, 2015 00:51 IST2015-08-25T00:51:23+5:302015-08-25T00:51:23+5:30

भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा उद्देश हा केवळ शेतकऱ्यांचे हित साधणे हाच आहे.

Farmers will not feel the shortage of funds | शेतकऱ्यांना निधीची कमतरता भासणार नाही

शेतकऱ्यांना निधीची कमतरता भासणार नाही

जिल्हा बँकेच्या सभेत सुनील फुंडे यांची ग्वाही : आर्थिक वर्षात १९,६९०.१० लाख रुपयांचे कर्ज वाटप
भंडारा : भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा उद्देश हा केवळ शेतकऱ्यांचे हित साधणे हाच आहे. त्यामुळे शेतकरी सभासदांना निधीची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांनी दिली.
शनिवारला आयोजित आमसभेत ते बोलत होते. यावेळी सुनिल फुंडे म्हणाले, ३१ मार्च २०१५ अखेर बँकेचे एकूण सभासद १,३०७ आहेत. बँकेचे अधिकृत भाग भांडवल ४० कोटीचे आहेत. बँकेचे वार्षिक क्रेडीट प्लॅन व शासनाने ठरवून दिलेल्या धोरणानुसार पीक कर्जाचे दर तज्ज्ञ समितीचे सभेत ठरविण्यात आले आहे. बँकेला सन २०१५-१६ करिता २९६.८० कोटींचे लक्षांक दिले आहे. आर्थिक वर्ष अखेर अल्पमुदती शेती थकीत कर्ज १६,१६०.६४ लक्ष रुपये आहे. बँकेच्या शताब्दी वर्ष कृषी पतधोरण अंतर्गत थेट कर्ज वाटप सुरु आहे. संस्थेच्या सभासदांना तथा ग्रामीण ग्रामीण भागातील वैयक्तिक सभासद त्यांची शेती आधुनिक तथा वैज्ञानिक पद्धतीने करून विकास करता यावा, शेती व्यवसायास पुरक व्यवसाय करून आर्थिक उन्नती साधता यावी, याकरिता बँकेकडून मुदती परतफेड कालावधीचे कर्ज वाटप विविध योजनेअंतर्गत केले आहे. आर्थिक वर्षात १९,६९०.१० लक्ष कर्ज वाटप करण्यात आले असून वसूली १९,८२३.२७ लक्ष रुपये झालेली आहे. शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांना वैयक्तिक गृहतारण कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मार्च २०१५ अखेर १ हजार बचत गट स्थापनेत बँकेला यश मिळाले आहे. स्थापन झालेल्या पैकी ७१२ गटांना ३० प्रशिक्षकांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले आहे. बँकेच्या ४६ शाखा कार्यान्वित असून संगणकीकरण होवून कोअर बँकींग प्रणाली अंतर्गत बँकेच्या डेटा सेंटरसोबत जोडण्यात आले आहे. एस.एम.एस. अलर्ट व ए.टी.एम. सेवा ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. भंडारा, तुमसर, साकोली, लाखनी, पवनी, जवाहरनगर, मोहाडी, सुरेवाडा, आमगाव, दिघोरी, आंबाडी व विरली येथे लॉकर सुविधा उपलब्ध आहे. यावेळी विविध ठराव सर्वानुमते पारीत करण्यात आले.
यावेळी नाना पंचबुद्धे, अ‍ॅड.जयंत वैरागडे, संचालक कैलाश नशिने, सदाशिव वलथरे, रामलाल चौधरी, अशोक मोहरकर रामराव कारेमोरे, रामदयाल पारधी, होमराज कापगते, विलास वाघाये, सत्यवान हुकरे, प्रशांत पवार, नरेंद्र बुरडे, वासुदेव तिरमारे, अंजिरा चुटे, तिरा तुमसरे, विजय खोब्रागडे, रुबी चढ्ढा, प्रेमसागर गणवीर, विनायक बुरडे, विलास काटेखाये, धनंजय दलाल, राजेश डोंगरे उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Farmers will not feel the shortage of funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.