निसर्गाच्या सानिध्यात शेतकऱ्यांनी घेतले आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:38 IST2021-02-05T08:38:44+5:302021-02-05T08:38:44+5:30
भंडारा तालुक्यातील हत्तीडोई येथे आयोजित राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानअंतर्गत एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत रोपवाटिका शेडनेट ...

निसर्गाच्या सानिध्यात शेतकऱ्यांनी घेतले आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे
भंडारा तालुक्यातील हत्तीडोई येथे आयोजित राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानअंतर्गत एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत रोपवाटिका शेडनेट हाऊसच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी डॉ. डी. यू. तुरस्कर, फार्मर प्रोड्युसर कंपनीचे आयटी प्रमुख गौरव सोमवंशी, महेंद्र शिंगारे, कृषितज्ज्ञ सुधीर धकाते, मंडल कृषी अधिकारी दीपक आहेर, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे, डॉ. नितीन तुरस्कर, कृषी सहायक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंद मोहतुरे, पर्यवेक्षक विजय हुमणे, होमराज धांडे, योगेश वासनिक, कांबळे, कृषी सहाय्यक रेणुका दराडे, करुणा उराडे, गिरिधारी मालेवार, हेमा टिचकुले, तिडके, पूजा म्हेत्रे, भगत, उईके, केदार, विकास मुळे, रणदिवे, प्रज्ञा गोस्वामी, जवंजाळ, तानाजी गायधने, संजय एकापुरे, कवडू शांतलवार, राजेश गायधनी उपस्थित होते. रोपवाटिकेचे उद्घाटन डॉ. डी. यू. तुरस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गौरव सोमवंशी यांनी शेतकऱ्यांना ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी व ऑनलाईन मार्केटिंग कशी करावी, याबाबत मार्गदर्शन केले. कृषितज्ज्ञ डॉ. सुधीर धकाते यांनी मिरची पिकावरील कीड रोग, त्याची ओळख, उपायोजना व खत पाणी व्यवस्थापन, युरोपीय देशात निर्यात करण्याचे काय मापदंड आहेत, यावर सखोल मार्गदर्शन केले. संचालन डॉ. नितीन तुरस्कर यांनी केले. आत्माचे तालुका व्यवस्थापक सतीश वैरागडे यांनी आभार मानले.