वीज देयकामुळे शेतकरी त्रस्त
By Admin | Updated: November 23, 2014 23:14 IST2014-11-23T23:14:04+5:302014-11-23T23:14:04+5:30
एकीकडे भारनियमाने सर्वत्र कहर तर दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांनी विज बिल भरले नाही त्या शेतकऱ्याचे कृषि पंपावरील विज कापण्याचा सपाटा सुरु केला आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष दयावे,

वीज देयकामुळे शेतकरी त्रस्त
पालोरा : एकीकडे भारनियमाने सर्वत्र कहर तर दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांनी विज बिल भरले नाही त्या शेतकऱ्याचे कृषि पंपावरील विज कापण्याचा सपाटा सुरु केला आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष दयावे, अन्यथा आझाद शेतकरी संघटनेकडून आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा संघटनेचे अध्यक्ष किशोर पंचभाई व अन्य शेतकऱ्यांनी दिला आहे, या संदर्भात अभियंताना निवेदन दिले आहे.
शेतकऱ्यांनी वेळेवर वीज देयक भरावे, म्हणून विज वितरण कंपनीकडून विविध योजना राबविल्या जात आहे. यात कृषी संजिवनी योजना ही शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. जे शेतकरी थकीतधारक आहे. त्यांनी कृषी संजिवनीचा लाभ घेवून रितसर विद्युत पुरवठा सुरु ठेवावा ,म्हणून विज कंपनीकडून गाजावाजा करुन ही योजना सुरु केली. या योजनेचे शेतकऱ्यांनी स्वागत केले होते. मात्र हिच कृषि संजीवनी योजना शेतकऱ्यांसाठी फसवी ठरली आहे. जे शेतकरी विज देयकापासून थकीत होते. त्यांनी कृषी संजीवनीचा लाभ मिळविण्याकरिता कर्ज काढून विज बिल भरले होते. ज्या शेतकऱ्यांनी बिल भरले त्यांच्या विज देयकात बिल लागून आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. पवनी येथील विज कार्यालयात दररोज शेकडो शेतकरी विज देयक घेवून येत आहे. धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या पवनी तालुक्यातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था निर्माण झाली आहे. यावर्षी पवनी तालुक्यात कोरडा दुष्काळ पडला आहे. अल्प पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली नाही. धानाला शेवटच्या एका पाण्याची गरज होती. मात्र पाणी न आल्यामुळे सर्वत्र कोरडा दुष्काळ पडला आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून विज देयक भरल होते. मात्र विज देयक लागुन आल्यामुळे बिल कमी करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे. कृषी संजीवनी लाभ शेतकऱ्यांना मिळणार किंवा नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. (वार्ताहर)