गोसेखुर्दच्या पाण्यासाठी डाव्या कालव्यावर शेतकऱ्यांचा ठिय्या

By Admin | Updated: September 18, 2016 00:30 IST2016-09-18T00:30:23+5:302016-09-18T00:30:23+5:30

विदर्भातील महत्वाकांक्षी गोसीखुर्द धरणाच्या परिसरातील गावांना सिंचनासाठी गोसीखुर्दचे पाणी मिळत नाही.

The farmers' stance on the left canal for Gosikhurd water | गोसेखुर्दच्या पाण्यासाठी डाव्या कालव्यावर शेतकऱ्यांचा ठिय्या

गोसेखुर्दच्या पाण्यासाठी डाव्या कालव्यावर शेतकऱ्यांचा ठिय्या

शेतकरी संकटात : पाण्याअभावी धानपीक हातचे जाणार !
पवनी / चिचाळ : विदर्भातील महत्वाकांक्षी गोसीखुर्द धरणाच्या परिसरातील गावांना सिंचनासाठी गोसीखुर्दचे पाणी मिळत नाही. त्यामुळे सतत चवथ्यावर्षीही समाधानकारक पाऊन न पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात या गावातील धानाची रोवणी होवू शकली नाही. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती नाजुक झाली आहे. गोसीखुर्द धरणाचे परिसरातील गावांना सिंचनासाठी पाणी मिळावे, या मागणीसाठी गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने शनिवारला दुपारी १२ वाजता शेतकरी, शेतमजूरांनी गोसीखुर्द समाज मंदिरातून काढलेल्या मोर्चाने पाथरी गावाजवळच्या डाव्या कालव्यावर धडक दिली.
या मोर्चात सहभागी होण्याकरीता परिसरातील महिला, पुरूष, युवक सकाळी १० वाजेपासूनच गोसीखुर्द गावात येणे सुरू झाले. दुपारी १२ वाजेपर्यंत मोठ्या संख्येने शेकडो लोक येताच मोर्चास सुरवात झाली. गोसीखुर्द धरणाचे पाणी सिंचनासाठी मिळालेच पाहिजे, गोसीखुर्द उपसा सिंचन योजना सुरू करावी, पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे आदी घोषणा दिल्या. हळूहळू मोर्चा मार्गक्रमण करीत डाव्या कालव्याच्या गेटवर धडकताच अड्याळ पोलिसांनी मोर्चा अडवीला. तिथेच मोर्चेकरी धरणे आंदोलनावर बसले. येथे संघर्ष समितीचे संयोजक विलास भोंगाडे, परसराम हुकरे, शंकर माटे, वामन भोयर, शंकर फुंडे, अनिल वानखेडे, दादा आगरे, समीक्षा गणवीर, गुणलता तागडे आदींनी मार्गदर्शन करून जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत येथून हटणार नाही, असा इशारा दिला.
या आंदोलनात रमेश भेंडारकर, रतीरामजी दोनोडे, जागेश्वर सुर्यवंशी, श्रीराम भेंडारकर, नत्थू भोयर, कवडू शिवणकर, वर्षा हत्तीमारे, कुसूम कठाने, ललीता भोयर, भिम्राव भिमटे, शेखर भगत, सुधाकर ठाकरे, अशोक घोरमोडे, बाबुराव माटे, कुंदन तागडे, प्रकाश मेश्राम, उत्तम मेश्राम, पुरूषोत्तम मेश्राम, पुंडलीक हरकंडे, रविंद्र गजभिये, सोमेश्वर चव्हाण, गुरूदेव पाथोडे, वर्षा भोयर, वासुदेव चन्ने, जयप्रकाश गजभिये, श्रीकृष्ण पांचलवार, सुनिल फुंडे, झिबल गणवीर, विलास पाऊलझगडे, जागेशव्र ब्राम्हणकर, तुकाराम हत्तीमारे, अरुण पाऊलझगडे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले आहेत. यावेळी अड्याळचे पोलीस निरीक्षक अजाबवराव नेवारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्थितीवर लक्ष ठेऊन होते. (तालुका प्रतिनिधी / वार्ताहर)

Web Title: The farmers' stance on the left canal for Gosikhurd water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.