शेतकऱ्यांनी प्रगत शेतीकडे वळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 23:01 IST2018-03-10T23:01:44+5:302018-03-10T23:01:44+5:30
शेतात शाश्वत पाणी व वीज पुरविण्याचे काम सरकारचे असून यासाठी राज्य शासन नियोजन करीत आहे.

शेतकऱ्यांनी प्रगत शेतीकडे वळावे
आॅनलाईन लोकमत
भंडारा : शेतात शाश्वत पाणी व वीज पुरविण्याचे काम सरकारचे असून यासाठी राज्य शासन नियोजन करीत आहे. दिवसाला सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत शेती सिंचनासाठी वीज देण्याची योजना आकार घेत आहे. शासनाचे सर्व लक्ष शेती व शेतकऱ्यांवर केंद्रीत आहे. कालचा राज्य सरकारचा अर्थसंकल्प हा शेतकरी समृद्ध करणारा आहे. शेतकरी सन्मान योजनेमध्ये भंडारा जिल्ह्यात यात ५४ हजार ६६९ शेतकऱ्यांच्या खात्यावर १२१ कोटी ५२ लाख रूपये जमा झाले. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतकऱ्यांनी आता पारंपरिक शेतीसह प्रगत शेतीकडे वळावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने दसरा मैदान येथे आयोजित वैनगंगा कृषी महोत्सवात ते बोलत होते. महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे होते.