शेतकऱ्यांनी सौर कृषिपंप योजनेचा लाभ घ्यावा

By Admin | Updated: December 12, 2015 00:43 IST2015-12-12T00:42:26+5:302015-12-12T00:43:35+5:30

जिल्ह्यात अनेक वेळा भारनियमनामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना तडाखा बसतो.

Farmers should take advantage of solar farming scheme | शेतकऱ्यांनी सौर कृषिपंप योजनेचा लाभ घ्यावा

शेतकऱ्यांनी सौर कृषिपंप योजनेचा लाभ घ्यावा

नाना पटोले यांचे आवाहन : १९५ लाभार्थ्यांची निवड
भंडारा : जिल्ह्यात अनेक वेळा भारनियमनामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना तडाखा बसतो. त्यामुळे शेतकरी यांचे फार मोठे नुकसान होते. ही बाब अनेक वर्षापासून प्रलंबित होती, परंतु सरकारच्या लक्षात आणून दिल्यानंतर सरकारने याला मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांनी सौर कृषिपंप योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार नाना पटोले यांनी केले आहे.
भंडारा जिल्ह्यासाठी शासनाने यावर्षी १९५ लाभार्थ्यांची निवड समितीमार्फत करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना पाच टक्के रक्कम भरावयाची आहे. त्यावेळी फक्त १९५ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. परंतु भविष्यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ कसा देता येईल यासाठी प्रयत्न राहणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात विहीर व शेततळे आहे.
यासाठी ही योजना आहे. सौरपंप लावल्यानंतर शेतकऱ्यांनी बिल येणार नाही, परंतु ज्याच्या विहिरीवर विद्युत पुरवठा आहे, त्यांना याचा लाभ घेता येणार नाही. ही अट आहे. पाच एकराच्या आतील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. शेतकरी बांधवांनी या सौर कृषी पंपाचा लाभ घेण्याचे आवाहन खा. नाना पटोले यांनी केले आहे. तसेच पाच वर्षापर्यंत या पंपाची देखभाल पुरवठा कंपनी करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर भुर्दंड बसणार आहे. भारनियमनापासून मुक्तता होईल तसेच कृषीपंप ८ ते १० तास चालणार आहे. इतर कोणताही अतिरिक्त खर्च येणार नाही.देश स्वातंत्र झाल्यापासून शेतकऱ्यांच्या समस्या वाढतच आहे. भाजप प्रणीत शासनाच्या वतीने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्रासह राज्य शासन कटिबद्ध आहे. शेतकरी अनेक वर्षांपासून दुष्काळाच्या छायेत लोटत आहेत. सिंचनाअभावी अनेक संकटाचा सामना करावा लागतो. हे लक्षात घेवून शासनाने सौरकृषी पंपाची योजना सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Farmers should take advantage of solar farming scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.