शेतकऱ्यांनो, स्वामीनाथन आयोगासाठी लोकचळवळ उभारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 22:13 IST2018-02-20T22:12:58+5:302018-02-20T22:13:17+5:30
बळीराजाला चहूबाजूंनी नागविल्या जात आहे. सर्व शेतकऱ्यांनी जात-पात विसरुन युवा शेतकऱ्यांना नेतृत्व करायला सांगा.

शेतकऱ्यांनो, स्वामीनाथन आयोगासाठी लोकचळवळ उभारा
आॅनलाईन लोकमत
दिघोरी/मोठी : बळीराजाला चहूबाजूंनी नागविल्या जात आहे. सर्व शेतकऱ्यांनी जात-पात विसरुन युवा शेतकऱ्यांना नेतृत्व करायला सांगा. स्वामीनाथन आयोगाच्या अंमलबजावणीासाठी लोकचळवळ उभारण्यासाठी सर्वांनी शासनाविरुध्द लढा द्यावा, असे आवाहन कृषी अर्थ तज्ज्ञ व जनमंचचे उपाध्यक्ष अमिताभ पावडे यांनी केले.
गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालय तावशीच्या वतीने आयोजित शिवाजी महाराज जयंती सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यीक राम महाजन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक अजय हजारे, सरपंच रामदास बडोले आदी उपस्थित होते. सकाळी गावातून भव्य शिवपालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सरपंच रामदास बडोले यांनी, शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर मार्गदर्शन केले. संचालन पियुष बडोले यांनी केले. तर प्रास्ताविक हरी डोंगरवार यांनी केले. आनंदराव थेर, प्रशांत फुंडे, नामदेव शेन्डे, राजेश पाचोळे, हरीभाऊ ब्राम्हणकर, कैलास बेले, रामू भुसारी व तारीकराम शेन्डे यांचे वतीने करण्यात आले. अश्मेक सरस्वती यांचे राष्टÑीय समाजप्रबोधनपर किर्तन झाले.