शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

शेतकऱ्यांचा धान व्यापाऱ्यांच्या दारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2022 21:59 IST

अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांजवळ दिवाळी सण साजरा करण्यासाठी एक छदामही नाही. अशा स्थितीत घरात आलेला धान विकण्याशिवाय पर्याय नाही. दिवाळी सणासाठी आता अनेक शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना धान विकत आहेत. शासनाचा हमी भाव २०४० रुपये असून व्यापारी १४०० रुपये प्रति क्विंटलने धान खरेदी करीत आहेत. प्रति क्विंटल ६०० रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सततच्या पावसाचे संकट झेलत शेतकऱ्यांचा धान घरात आला. दिवाळीपूर्वी आधारभूत केंद्र सुरू होईल अशी अपेक्षा होती. मात्र, आता केंद्र सुरू होण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे शेतकरी दिवाळी सण साजरा करण्यासाठी व्यापाऱ्यांना धान विकत आहेत. प्रतिक्विंटल ६०० रुपयांचा फटका सहन करीत आहेत.भंडारा जिल्हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. जिल्ह्यात १ लाख ७५ हजार हेक्टर क्षेत्रावर धानाची लागवड करण्यात आली होती. तीनदा झालेली अतिवृष्टी आणि सतत सुरु असलेल्या पावसाने धानाचे मोठे नुकसान झाले. अशा स्थितीतही शेतकऱ्यांनी हिंमत न हारता धानाची कापणी सुरू केली. बहुतांश शेतकऱ्यांकडे आता हलक्या प्रतीचा धान घरी आला आहे. मात्र, तो विकावा कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. साधारणत: दिवाळीपूर्वी धान खरेदी केंद्र सुरू झाले की शेतकरी आपला धान पणन महासंघाला देतात. परंतु यावर्षी अद्यापही ऑनलाइन नोंदणीच सुरू आहे. त्यामुळे धान खरेदी सुरु केव्हा होणार असा प्रश्न आहे.दुसरीकडे दिवाळी अगदी अवघ्या पाच दिवसावर आली आहे. दिवाळी सण साजरा कसा करावा असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांजवळ दिवाळी सण साजरा करण्यासाठी एक छदामही नाही. अशा स्थितीत घरात आलेला धान विकण्याशिवाय पर्याय नाही. दिवाळी सणासाठी आता अनेक शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना धान विकत आहेत. शासनाचा हमी भाव २०४० रुपये असून व्यापारी १४०० रुपये प्रति क्विंटलने धान खरेदी करीत आहेत. प्रति क्विंटल ६०० रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. अनेक व्यापाऱ्यांचे दलाल गावागावांत फिरुन शेतकऱ्यांचे धान खरेदी करीत असल्याचे चित्र आहे.

अपुऱ्या धान खरेदी केंद्राने होणार अडचणजिल्ह्यात आतापर्यंत २७ धान खरेदी केंद्रांना परवानगी देण्यात आली आहे. आणखी ३० ते ४० धान केंद्रांना खरेदीची परवानगी मिळणार आहे. मात्र, या अपुऱ्या धान खरेदी केंद्रांमुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण होणार आहे. गतवर्षी जिल्ह्यात २०७ धान खरेदी केंद्र होते.मात्र, त्यानंतरही शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी विविध समस्यांचा सामना करावा लागला होता. धान खरेदी केंद्रांची संख्या वाढविण्याची मागणी होत आहे. 

सावकारांकडे धाव- हलक्या धानाचे सततच्या पावसाने मोठे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांचे तर संपूर्ण धानपीक उद्ध्वस्त झाले. एक क्विंटलही धान घरी येण्याची शक्यता नाही. अशा शेतकऱ्यांना आता सावकाराकडे जाऊन पैसे घ्यावे लागणार आहेत. दिवाळी सण साजरा करण्यासाठी अनेक जण सावकाराच्या दारात दिसत असून काही शेतकरी आपल्या पत्नीचे सौभाग्य लेणे मंगळसूत्र गहाण ठेवण्याच्या तयारीत आहेत. तर अनेक शेतकरी कुणाकडून उसणवार पैसे मिळतात काय याची चाचपणी करीत आहेत.

 

टॅग्स :FarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड