शेतकऱ्यांनो, संघटितपणे शेती करण्याची गरज

By Admin | Updated: February 5, 2016 00:38 IST2016-02-05T00:38:15+5:302016-02-05T00:38:15+5:30

शेतकरी हा देशाचा आधार आहे. या आधाराला टिकविण्याची धुरा प्रत्येकाची आहे. शेतकऱ्यांनो आधार स्वत:चा स्वत: तयार करा.

Farmers, need to organize farming together | शेतकऱ्यांनो, संघटितपणे शेती करण्याची गरज

शेतकऱ्यांनो, संघटितपणे शेती करण्याची गरज

प्रवचनातून ज्ञानामृत : हभप मुक्ताश्री दीदी यांचे प्रतिपादन, भागवत सोहळा
पालांदूर (चौ.) : शेतकरी हा देशाचा आधार आहे. या आधाराला टिकविण्याची धुरा प्रत्येकाची आहे. शेतकऱ्यांनो आधार स्वत:चा स्वत: तयार करा. आधाराकरिता एकत्रित येत संघटितपणाने शेती कसा. खर्च अत्यल्प करून बाजारपेठेचा अभ्यास घेत राजा प्रभूचे दृष्टांत देत व वास्तववादी चित्र रेखाटत शेतकऱ्यांच्या मानसिकतेला शक्ती दिली.
पालांदूर येथील सार्वजनिक हनुमान मंदिरात भागवत स्प्ताहाच्या पाचव्या दिवशी दुसऱ्या सत्राचे पुष्प गुंफताना भक्तगणांना ज्ञानामृत पाजले. कृषी, शिल्पाकृती शिला व्यवसायाचा आद्य प्रवर्तक राजा प्रभु आहे. बांध, बंधारे बांधून पाणी जिरवा पाणी मुरवाचा संदेश देत शेती कशी करावी, याचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना दिले होते. स्वत: एकट्याने शेती न करता समुहाने शेती केल्यास उत्पन्न वाढून काटकसरीने खर्च करा. शेती पुरक लहान व्यवसाय करा.
शासनस्तरावर प्रशासनाच्या वतीने थेट शेतावर मार्गदर्शनाकरीता कर्मचारी येत आहेत. शून्य व्याजदराने पिककर्ज, अनुदानावर बि-बियाणे, मोटारपंप, अत्याधुनिक सिंचन साधने याचा लाभ घेत खर्च अत्यल्प करा आदी प्रवचन दोन तास शेती विषयावर करीत आत्महत्या टाळण्याचे आवाहन केले. (वार्ताहर)

Web Title: Farmers, need to organize farming together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.