पद्धतीचा उपयोग करावाआधुनिक शेती : पठाण यांचे आवाहनसाकोली : निसर्गाची अवकृपा, शेतीचे वाढते खर्च व कमी प्रमाणात मिळणारा नफा यावर उपाययोजना काळाची गरज ठरली आहे. पारंपारिक शेतीला बगल देत शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करावी, शेतकऱ्यांनी रोवणी करताना जपानी पद्धतीचा अवलंब करावा. यामुळे धानाला रोग कमी प्रमाणात लागत असून मजुरीही कमी लागते व उत्पन्न जास्त मिळते.असे आवाहन कृषीसहाय्यक एम.पी. पठाण यांनी धर्मापुरी येथे यादोराव कापगते यांच्या शेतात जापानी पद्धतीचा रोवणा सुरु असताना शेतकरी व उपस्थित मजुरांना केले.साकोली तालुक्यातील धर्मापुरी, कुंभली, जमनापूर, साकोली, पाथरी येथील शेतकऱ्यांनी जपानी पद्धतीचा अवलंब करून रोवणी केली आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीनेच शेती करावी असे आवाहनही पठाण यांनी यावेळी केले. (तालुका प्रतिनिधी)
शेतकऱ्यांनी जपानी शेती
By admin | Updated: July 21, 2015 00:43 IST