शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

उपसा सिंचनमुळे ४३ गावांतील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 17:13 IST

नरेंद्र भोंडेकर यांनी घेतला आढावा : नियोजन करण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा: विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाकडून सांगवारी आणि धारगाव या दोन उपसा सिंचन योजनांना मंजुरी मिळाली आहे. धारगाव उपसा सिंचन योजनेमुळे १८ गावांतील शेतकऱ्यांना तर, सांगवारी योजनेमुळे पेच प्रकल्पाच्या काळव्याच्या टेलवर निर्भर असलेल्या २९ गावांतील ७,०३१ हेक्टर क्षेत्र पुनर्स्थापित होणार आहे. ४३ गावांना सिंचनाचा लाभ देणाऱ्या या योजनेच्या कामाचा आ. नरेंद्र भोंडेकर यांनी चर्चेतून आढावा घेतला.

भंडारा व पवनी तालुक्यांतील चार उपसा सिंचनसंदर्भात विदर्भ पाटबंधारे महामंडळ नागपूरचे कार्यकारी संचालक सोनटक्के आणि अन्य अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीदरम्यान हा आढावा घेण्यात आला.

या सोबतच तीरीं मिन्सी उपसा सिंचन, कातखेडा उपसा सिंचन प्रकल्पाची मंजुरी आणि नेरला व खापरी (रेहपाडे) या गावांच्या पुनर्वसन संदर्भातही चर्चा करण्यात आली. सांगवारी आणि धारगाव या योजनांच्या प्रथम टप्प्याच्या निधीलाही सरकारने मंजुरी दिली आहे. या दोन्ही - प्रकल्पाची कामे तातडीने सुरू करून अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी अभ्यासपूर्ण काम करण्याची सूचना भोंडेकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. योजनेची कामे लवकरात लवकर प्रारंभ करून विस्तारित करण्यासोबत सिंचन योजनेशी विविध विषयांवर चर्चा आवश्यक सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या. पवनी तालुक्यातील नेरला उपसा सिंचन योजने अंतर्गत क्षेत्रातील ११ गावांना तत्काळ समाविष्ट करण्यासंदर्भातही निर्देश देण्यात आले.

नेरला व खापरी (रेहपाडे) च्या पुनर्वसनावर चर्चा• या बैठकीत नेरला व खापरी (रेहपाडे) या गावांचे पुनर्वसन करण्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. पुनर्वसनाकरिता लागणाऱ्या अतिरिक्त निधीसाठी सरकारच्या सिंचन नियामक मंडळाकडे लवकरात लवकर प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश देण्यात आले.• पवनी तालुक्यातील गुडेगाव, खातखेडा व नचेगाव या तीनही गावांना गोसे प्रकल्पाच्या उजव्या कालव्यामध्ये समाविष्ट करण्याच्या दृष्टीनेही चर्चा करण्यात आली.

टॅग्स :Drip Irrigationठिबक सिंचनfarmingशेतीFarmerशेतकरीbhandara-acभंडारा