शेतकऱ्यांना १६ तास वीज मिळणार

By Admin | Updated: February 22, 2017 00:39 IST2017-02-22T00:39:25+5:302017-02-22T00:39:25+5:30

शेतकऱ्यांना उन्हाळी पिकांकरिता १६ तासांच्या भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे.

Farmers get 16 hours of electricity | शेतकऱ्यांना १६ तास वीज मिळणार

शेतकऱ्यांना १६ तास वीज मिळणार

नाना पटोले यांचे आश्वासन : शिवजयंती रॅलीला संबोधन
पालांदूर : शेतकऱ्यांना उन्हाळी पिकांकरिता १६ तासांच्या भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे. यातून लवकरच सावरत २५ फेब्रुवारीपर्यंत १६ तास वीज सुरळीत मिळणार असल्याचे आश्वासन खासदार नाना पटोले यांनी दिले. पालांदुरात शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीला संबोधित करताना ते बोलत होते.
यावेळी सरपंच शुभांगी मदनकर, कवलेवाडा येथील सरपंच वैशाली खंडाईत कवलेवाडा, भरत खंडाईत, नितीन रणदिवे, रत्नाकर नागलवाडे, कृष्णा जांभुळकर, आनंदराव मदनकर, मोरेश्वर खंडाईत, भुमेश्वरी खंडाईत आदी हजर होते.
नाना पटोले म्हणाले, २७ फेब्रुवारीला लाखनी तालुक्याच्या ठिकाणी जनता दरबार आयोजिला असून सर्वच समस्यावर तोडगा काढण्याकरिता प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे.
घरकुल मधील बीपीएलची अट रद्द करीत ‘सबका साथ सबका विकास’ ही सरकारची चळवळ पुढे न्यायचे असे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत रॅलीचा उत्साह गगनात मानावासा झाला. शेतकरी बांधवांनी कमी पाण्याची पिके निवडावी. कमी पाण्यात अधिक उत्पन्न घेत बाजारपेठेचा अभ्यास ठेवूनच पिके निवडावी.
यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या. खासदार नाना पटोलेंनी त्यांना आश्वास्थ करीत समस्यांचे निराकरण केले. आभार भरत खंडाईत यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत जनता दरबारात हजेरी लावण्याचे आवाहन केले. (वार्ताहर)

Web Title: Farmers get 16 hours of electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.