युरिया खतासाठी शेतकऱ्यांची पायपीट
By Admin | Updated: September 25, 2014 23:18 IST2014-09-25T23:18:07+5:302014-09-25T23:18:07+5:30
कोंढा परिसरात सध्या युरिया खताचा तुटवडा भासत आहे. कोंढा गावाचा जवळपासच्या २० गावासी संपर्क येतो. मोठी बाजारपेठ असून ६ कृषी केंद्रे आहेत. कृषी केंद्रात युरिया खत आले असल्याची माहिती

युरिया खतासाठी शेतकऱ्यांची पायपीट
जादा भावात विक्री : शेतकरी संकटात
कोंढा/कोसरा : कोंढा परिसरात सध्या युरिया खताचा तुटवडा भासत आहे. कोंढा गावाचा जवळपासच्या २० गावासी संपर्क येतो. मोठी बाजारपेठ असून ६ कृषी केंद्रे आहेत. कृषी केंद्रात युरिया खत आले असल्याची माहिती शेतकऱ्यांना मिळताच शेतकरी खतासाठी रांगाच्या रांगा दिसत आहेत.
कोंढा परिसरात सध्या पाऊस बऱ्यापैकी पडला. त्यामुळे धान पिकाला युरिया खत टाकून धान पिक वाढविण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. अशावेळी युरिया खत दुकानात आल्याची माहिती मिळताच शेतकरी काही मिनिटांत कृषी केंद्रात गर्दी करीत आहेत. दि.२३ ला कोंढा दोन्ही कृषी केंद्रात प्रत्येकी १८० बॅग युरीया आल्याची माहिती मिळताच शेतकऱ्यांनी दुकानात प्रचंड गर्दी केली. अर्धा एक तासात १८० बॅग विकले. त्यानंतर शेतकऱ्यांनी दुसऱ्या केंद्रात जाऊन तिथे आलेल्या युरियाच्या बॅग खरेदी केल्या. अशाप्रकारे एक दोन तासाच ३६० बॅग युरिया शेतकऱ्यांनी खरेदी केल्या. कोंढा येथे ५४० बॅग युरिया तीन कृृषी केंद्रात येणार आहे. याची कृषी विभाग पंचायत समिती पवनी व जिल्हा परिषद कृषी विभागाला माहिती असल्याने खताची गाडी कृषी केंद्रासमोर लागल्याबरोबर कृषी विभागाचे अधिकारी कृषी केंद्रात स्वत: उपस्थित झाले. त्यांनी स्वत:समोर गाडी खाली करण्यास लावून शेतकऱ्यांना केंद्र संचालकांना २९८ रूपये प्रमाणे युरिया विकण्यास सांगितले. यावेळी कृषी विस्तार अधिकारी वानखेडे, जि.प.चे कृषी विकास अधिकारी किरवे, कृषी नियंत्रक कावळे व कृषी सहायक यावेळी कोंढा येथे युरिया विकताना स्वत: उपस्थित होते. दि.२४ सप्टेंबर रोजी कृषी केंद्र येथे १८० बॅग युरिया आला असल्याने ते विक्री करताना कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. दि.२३, २४ सप्टेंबर रोजी कोंढा परिसरात युरियाची ५४० बॅग विकण्यात आले. युरियाची मागणी प्रचंड आहे. अशावेळी पुन्हा जास्तीचा युरिया खताची मागणी करणे आवश्यक आहे. खताचा काळाबाजार होऊ नये यासाठी कृषी विभागाचे अधिकारी कृषी केंद्रावर नजर ठेवून आहेत. यासंबंधात पंचायत समितीचे पवनी कृषी विस्तार अधिकारी वानखेडे यांना विचारले असता युरिया खत पुन्हा कोंढा येथे मागणीनुसार उपलब्ध करून दिल्या जाईल. युरिया खत जास्त भावाने विकल्यास शेतकऱ्यांनी लेखी तक्रार करावे, असे कळविण्यात आले.