मजुरी वाढल्याने शेतकरी आर्थिक संकटात
By Admin | Updated: May 22, 2015 01:08 IST2015-05-22T01:08:19+5:302015-05-22T01:08:19+5:30
महागाई वाढली असली तरी त्यातुलनेत शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला नाही. त्यातच मजुराची मजुरी कडाडल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

मजुरी वाढल्याने शेतकरी आर्थिक संकटात
आसगाव (चौ.) : महागाई वाढली असली तरी त्यातुलनेत शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला नाही. त्यातच मजुराची मजुरी कडाडल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
दरवर्षी बियाणे, खते, किटकनाशकाच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याही परिस्थितीत वाढीव भावाने बियाणे व खते घेवून शेतकरी आपली शेती करण्यास पुढे आला आहे. वाढीव भावाने बियाणे व खते घेताना बँकेचे व सावकाराच्या कर्जाचा बोझा शेतकऱ्यांना सोसावा लागत असताना मजुरांची मजुरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ज्या शेतकऱ्यांजवळ शेती मोठी आहे. परंतु निर्धारित वेळेतच पिकाची मशागत करावी लागते. अन्यथा त्याचा काहीही उपयोग होत नाही. परिणामी पीक अत्यल्प येत असते. याकरिता शेतकरी डवरणी, फवारणी करण्याकरिता भाडे तत्वाचा अवलंब करीत आहेत. पुरूष व स्त्री मजुर गावात मिळेनासे झाल्याने त्यांना इतर गावातून आणण्यासाठी वाहनाचा खर्चही शेतकऱ्यास करावा लागतो. या मजुरी वाढीच्या व बियाणे तथा खताच्या दरवाढीनंतरही शेतकऱ्यांचा मालाला शासन तसेच व्यापारी योग्य भाव देत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचा कर्जाचा डोंगर वाढत आहे. संकटात असलेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदतीचा हात देण्याची मागणी आहे. (वार्ताहर)