भारनियमनविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
By Admin | Updated: August 2, 2016 00:36 IST2016-08-02T00:36:03+5:302016-08-02T00:36:03+5:30
कृषिपांला १६ तासाचे भारनियमन सुरु केल्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती दयनीय झाली असून बऱ्याच शेतकऱ्यांची रोवणी खोळबंली आहे.

भारनियमनविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
साकोलीत आजपासून आंदोलन : आल्यापावली परतले शेतकरी
साकोली : कृषिपांला १६ तासाचे भारनियमन सुरु केल्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती दयनीय झाली असून बऱ्याच शेतकऱ्यांची रोवणी खोळबंली आहे. हे भारनियमन बंद करण्यात यावे यासाठी आज शेतकरी विजवितरणी कंपनीच्या कार्यालयात आले होते. मात्र कार्यकारी अभियंता गैरहजर असल्याने शेतकऱ्यांना आल्यापावली परतावे लागले. त्यामुळे आज मंगळवारपासुन विजवितरण कंपनीच्या कार्यालयासमोरच शेतकरी आंदोलन करणार आहे.
२९ जुलै रोजी तालुक्यातील शेतकऱ्यांनी १६ तासाचे भारनियमन बंद करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन दिले होते. हे भारनियमन १ आॅगस्टपर्यंत बंद न केल्यास तीव्र आंदोलन करु असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला होता. याच अनुषंगाने आज तालुक्यातील शेतकरी दिला होता. याच अनुषंगाने आज तालुक्यातील शेतकरी विजवितरण कंपनीच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडून बसले होते. कार्यकारी अभियंता हे गैरहजर असल्याने शेतकऱ्यांना आल्यापावली परत जावे लागले. आॅगस्ट महिला लागला तरी बऱ्याच शेतकऱ्यांची रोवणी झाली नाही. त्यामुळे याही वर्षी शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागणार का? अशी स्थिती असतानाही शासनाने १६ तासाचे भारनियमन सुरु केल्याने शासन शेतकऱ्यांच्या हिताचे आहे का? त्यामुळे भारनियमन बंद करण्यात यावे यासाठी उद्यापासुन आंदोलन करण्यात येणार आहे. आज शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष अविनाश ब्राम्हणकर, जि.प .सदस्य अशोक कापगते, नरेश वाडीभस्मे, प्रविण भांडारकर, माजी उपसभापती नरेश नगरीकर यांच्यासह तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)