वीजपुरवठ्याअभावी जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:24 IST2021-07-16T04:24:58+5:302021-07-16T04:24:58+5:30
बॉक्स डिझेलच्या दरवाढीने इंजिनही शेतकऱ्यांना परवडत नाही वीज उपलब्ध राहत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. तर दुसरीकडे इंजिन लावून ...

वीजपुरवठ्याअभावी जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त
बॉक्स
डिझेलच्या दरवाढीने इंजिनही शेतकऱ्यांना परवडत नाही
वीज उपलब्ध राहत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. तर दुसरीकडे इंजिन लावून त्यावर रोवणी करायचे म्हटले तरी डिझेलचे वाढलेले दर पाहता शेतकऱ्यांना इंजिनवर धान रोहिणी करणे शक्य नाही. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांचा विचार करता चोवीस तास वीज पुरवठा सुरळीत करावा अशीच मागणी सध्या होत आहे.
नागपूरला दिवसभर वीज मिळते भंडाराला का नाही
भंडारा तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या खरबी, चिखली परिसरालगत नागपूर जिल्ह्याच्या हद्दीत असलेल्या गावांमध्ये दिवस दिवसभर वीज जात नाही. मात्र शेजारीच असलेल्या भंडारा जिल्ह्यातील गावात मात्र विजेचे असलेले भारनियमन पाहता शेतकरी हवालदिल होत आहेत. नागपूर जिल्ह्यात मात्र शेतकर्यांना चोवीस तास वीज मिळत आहे. तर दुसरीकडे भंडारा जिल्ह्यात मात्र शेतकऱ्यांना किमान आठ तास वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने हा अन्याय आमच्यावर का असा सूर शेतकर्यांतून उमटत आहे.एकीकडे वीज वितरणाच्या धोरणाने शेतकरी हतबल झाला आहे तर दुसरीकडे आता शासनाच्या उदासीनतेमुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. यावर लोकप्रतिनिधींनीच तोडगा काढण्याची मागणी होत आहे.
बॉक्स
कुठे संततधार तर कुठे पावसाची रिमझिम
अद्यापि अनेक गावांना पावसाची प्रतीक्षा आहे.
धान रोपे लागवडीयोग्य झाली असतानाही पाऊस, विजेमुळे रोवणी रखडली आहे.भंडारा जिल्ह्यात गुरूवारी दुपारी अनेक ठिकाणी पाऊस झाला. मात्र असे असले तरीही अनेक परिसरात पावसाने उसंत दिली आहे. काही तालुक्यात कमी प्रमाणात पाऊस झाला आहे.अनेक ठिकाणी संततधार पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा आनंदित झाला आहे त्यामुळे एकंदरीत जिल्ह्याचा विचार करता कही खुशी कही गम असेच चित्र दिसून येते.जिल्ह्यात वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
कोट
आमच्या गावालगत नागपूर जिल्ह्यातील शेतशिवारात चोवीस तास वीज राहते.तर मग भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर का अन्याय केला जात आहे.वीज पुरवठा खंडित होत असल्याने सिंचनाची सोय असतानाही शेतकऱ्यांना वेळेवर रोवणी करता येत नाही. यावर तोडगा न निघाल्यास शेतकऱ्यांसमवेत आंदोलन करावे लागेल.
संजय आकरे,
उपसरपंच, खरबी नाका