विहिरींच्या लाभापासून शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2016 00:40 IST2016-07-01T00:40:37+5:302016-07-01T00:40:37+5:30

शासनाकडून मग्रारोहयो योजने अंतर्गत कोरडवाहू शेतकऱ्यांना उत्पन्नात वाढ होवून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाकडून सिंचन विहिरींचा लाभ देण्यात येते.

Farmers deprived of the benefit of wells | विहिरींच्या लाभापासून शेतकरी वंचित

विहिरींच्या लाभापासून शेतकरी वंचित

शेतकऱ्यांना फटका : लाभ देण्याची शेतकऱ्यांची मागणी
लाखांदूर : शासनाकडून मग्रारोहयो योजने अंतर्गत कोरडवाहू शेतकऱ्यांना उत्पन्नात वाढ होवून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाकडून सिंचन विहिरींचा लाभ देण्यात येते. लाखांदूर तालुक्यात सन २०१५-१६ या सत्रात ७१ सिंचन विहिरींच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. परंतु लाखांदुरातील सन २०१३-१४ पासून १२ शेतकऱ्यांच्या सिंंचन विहिरींचे प्रस्ताव लाखांदूर ग्रा.पं. मार्फत ठराव घेवून लाखांदूर पं.स. ला पाठविण्यात आले. पण मात्र, अद्यापही त्या पात्र व गरजू शेतकऱ्यांना देण्यात आलेला नाही.
पंचायत समिती खंडविकास अधिकाऱ्याशी विचारणा केली असता लाखांदूर नगरपंचायत झाल्याने लाखांदूरच्या शेतकऱ्यांना सिंचन विहिरींच्या व शेतीसंबंधी लागणारे कृषी औजारे, पाईप, किटकनाशक औषध, ताडपत्री, इंजिन वगैरे मिळू शकत नाही, असे सदर शेतकऱ्यांना बिडीओंनी सांगितले. विहिरींचा लाभ का देण्यात आलेला नाही, असा सवाल लाखांदुरातील पात्र व गरजू शेतकऱ्यांनी केला आहे. लाखांदूर नगरपंचायत झाल्याने लाखांदुरातील शेतकऱ्यांना पं.स. मार्फत सिंचन विहिरीचा लाभ देण्यात येणार नाही, असे संबंधित सांगण्यात अधिकाऱ्यांनी सदर शेतकऱ्यांना सांगितले. लाखांदूर नगरपंचायत झाल्याने लाखांदुरातील पात्र व गरजू शेतकरी सिंचन विहिरींच्या लाभापासून वंचित आहेत. यात दोष कुणाचा, लाखांदुरातील शेतकऱ्यांचा की, शासनाचा असा सवाल लाखांदुरातील शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. शासनाने लाखांदुरातील शेतकऱ्यांना सिंचन विहिरींचा लाभ देण्याची मागणी लाखांदुरातील १२ पात्र व गरजू कोरडवाहू शेतकऱ्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Farmers deprived of the benefit of wells

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.