दुष्काळ घोषित करण्याची शेतकऱ्यांची मागणी
By Admin | Updated: October 25, 2015 00:31 IST2015-10-25T00:31:04+5:302015-10-25T00:31:04+5:30
तालुक्यातील सालेभाटा येथील शेतकरी व शेतमजूर संघटनेद्वारे तहसिलदार डी.सी. बोंबोर्डे यांना निवेदन देऊन सालेभाटा व लाखोरी परिसरात धान उत्पादक शेतकऱ्यांना...

दुष्काळ घोषित करण्याची शेतकऱ्यांची मागणी
तहसीलदारांना निवेदन : अन्यथा आंदोलनाचा इशारा
लाखनी : तालुक्यातील सालेभाटा येथील शेतकरी व शेतमजूर संघटनेद्वारे तहसिलदार डी.सी. बोंबोर्डे यांना निवेदन देऊन सालेभाटा व लाखोरी परिसरात धान उत्पादक शेतकऱ्यांना अत्यल्प उत्पन्न झाल्यामुळे दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांचे शासनाने कर्ज माफ करण्याची व इतर सोयी सुविधा देण्याची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांना २५ हजार रूपये एकर तात्काळ नुकसानभरपाई द्यावी कर्जमुक्त करून सातबारा कोरा करावा, १० हजार रूपये शेतकऱ्यांना बोनस द्यावा, हमी भावात वाढ करावी, जुनी आणेवारी पद्धत नष्ट करावी आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
शेतकऱ्यांचे नेतृत्व सुनील पाटील पटले, श्यामसुंदर देशमुख, जि.प. सदस्य ज्ञानेश्वर रहांगडाले, पं.स. सदस्य मोरेश्वरी पटले, सुरेश बोपचे, सुदर्शन वाघमारे, सुरेश बोपचे यांनी केले.
याप्र्रसंगी सरपंच उज्ज्वला जनबंधू, नूतन ठाकरे, प्रदीप रहांगडाले, संजय रहांगडाले, संजय बोपचे, धनराज पारधी, पुरण पटले, सुनिल बांते, सरपंच माया अंबुले, धनंजय ठाकरे, कुंडलीक रहांगडाले, शक्तिदास बोपचे, रामनाथ पारधी, गणराज पारधी आदी परिसरातील गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)
शासनाने शेतकऱ्यांच्या आत्महत्येची वाट पाहावी का?
तालुक्यातील मांगली रेंगोळा येथील दिलीप चौधरी या धान उत्पादक शेतकऱ्याने सततची नापिकीमुळे आत्महत्येचा मार्ग स्वीकारला यामुळे त्या शेतकऱ्याच्या कुटुंब निराधार झाले आहे. धान उत्पादक शेतकऱ्याकडे शासन दुर्लक्ष करीत असून लाखनी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्याची मागणी लाखनी तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष सुनील गिऱ्हेपुंजे यांनी केली आहे. किती आत्महत्याची शासनाने वाट बघावी, असा प्रश्न गिऱ्हेपुंजे यांनी उपस्थित केला आहे. तालुक्यात दुष्काळ घोषित करून कर्जमाफ केले नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा सुनील गिऱ्हेपुंजे यांनी दिला आहे.
आत्महत्येचा मार्ग स्वीकारू नका -सेवक वाघाये
धान उत्पादक शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारू नये, असे आवाहन माजी आमदार सेवक वाघाये यांनी केले आहे. तुटपुंज्या कर्जाने निराश होऊन आत्महत्या करून कुटुंबाला वाऱ्यावर सोडू नये. शेतकरी हा कुटुंबाचा कर्ता पुरूष आहे. त्याची हिंमत खचली तर कुटुंबापुढे संकट निर्माण होतात. अनेक मोठमोठे उद्योगपती शासनाचे कर्ज बुडवितात त्याचे शासन वाईट करत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी हिंमत हारू नये.