शहरं
Join us  
Trending Stories
1
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
2
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
3
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
4
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
6
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
7
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
8
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
9
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
10
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
11
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
12
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
13
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
14
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
15
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
16
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
17
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
18
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
19
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
20
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली

धान खरेदी केंद्रावर होतेय शेतकऱ्यांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर दिघोरी येथे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासाठी शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु केले. मात्र गत काही दिवसांपासून दिघोरी मोठी येथील धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची हमालांकडून लुबाडणूक केली जात आहे.

ठळक मुद्देदिघोरी येथील प्रकार : हमाली दर घेतला जातो दुप्पट

लोकमत न्यूज नेटवर्कदिघोरी मोठी : लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी येथील धान खरेदी केंद्रावर हमालांकडून शेतकºयाचे धान उतरविण्यासाठी लुट केली जात असल्याचा प्रकार सुरु आहे. लाखांदूर खरेदी-विक्री संघ आणिशेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर दिघोरी येथे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासाठी शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु केले. मात्र गत काही दिवसांपासून दिघोरी मोठी येथील धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची हमालांकडून लुबाडणूक केली जात आहे.शासनाने प्रतिक्विंटल १५ रुपये हमाली घेण्याचे आदेश दिले असताना दिघोरी केंद्रावर मात्र शेतकऱ्यांकडून ३० रुपये प्रति क्विंटल दराने हमाली घेतली जात आहे. याबाबत काही शेतकऱ्यांनी तक्रार केली असता शेतकऱ्यांना अश्लिल शिवीगाळ केल्याचा धकादायक प्रकार घडला आहे. जे शेतकरी तक्रार करतात त्यांचा धान हेतुपरस्परपणे उशीरा मोजला जातो. त्यांनाथांबवले जाते.शेतकऱ्यांची आर्थिक लुट होत व दामदुप्पट दराने लुबाडणूक करुन हमाल गैरफायदा घेत असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. याबाबत खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष अरुण गभने यांच्याशी संपर्क साधला असता. त्यांनी याबाबत हमालांना विचारणा करणार असल्याचे सांगितले.हमालांना १५ रुपये प्रति क्विंटल दर शासनाने ठरवून दिला आहे. त्यानुसारच शेतकऱ्यांकडून हमाली घेण्यात यावी, अशी अपेक्षा आहे. जर अधिक दराने शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात असेल तर हमाल बदलले जातील.- अरुण गभने, उपाध्यक्षखरेदी-विक्री संघ, दिघोरी/मोठी

टॅग्स :Farmerशेतकरी