पीक वाचविण्यासाठी शेतकºयांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 23:39 IST2017-08-05T23:38:28+5:302017-08-05T23:39:21+5:30

भूगर्भातील जलस्त्रोत आटल्याने परिसरातील शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे.

Farmers' agitation to save the crops | पीक वाचविण्यासाठी शेतकºयांची धडपड

पीक वाचविण्यासाठी शेतकºयांची धडपड

ठळक मुद्देभूगर्भातील पाणी आटले : ५५ टक्के शेतकºयांची रोवणी थांबली

लोकमत न्यूज नेटवर्क
आसगाव (चौ.) : भूगर्भातील जलस्त्रोत आटल्याने परिसरातील शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे. सध्या शेतकरी रोवणी व पीक वाचविण्यासाठी केवीलवानी धडपड करीत आहे.
कर्जमाफी व अनुदानासाठी बँकेत तसेच आॅनलाईन फार्म भरण्यासाठी महा ई सेवा केंद्रात शेतकरी चकरा मारीत आहे. दिवसभर उपाशी राहून शासनाकडून काही मदत मिळेल या आशेने शेतीचे कामे सोडून शेतकरी बँकेच्या चकरा मारताना दिसून येत आहे. शासनाकडून हा होत असलेला ससेमीरा संपवून जे शेतकरी त्या योजनेत बसत असतील त्यांना कर्जमाफी किंवा सवलतीचा फायदा द्यायला पाहिजे. मात्र सध्यातरी असे होताना दिसत नाही. ज्या शेतकºयांची रोवणी आटोपली त्यांना पाण्याची नितांत गरज आहे. मात्र पावसाने दगा दिल्याने रोवणी सुकु लागली. त्यामुळे यंदा भंडारा जिल्ह्यावर दुष्काळाची गडद छाया पसरली आहे.
महत्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्प असताना शेतकºयांच्या शेतीला अपेक्षेनुसार पाणी मिळत नसेल तर येथील शेतकºयांचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल. दिव्याखाली अंधार अशीच काहीही परिस्थिती पवनी तालुक्यातील शेतकºयांची झाली आहे. त्याचप्रमाणे धरणामुळे भूगर्भात झिरपणारे पाणी पूर्णत: बंद झाल्याने सिंचनाच्या शेतीतील विहिरीतील पाणी आटले असून चौरास भाग वाळवंट होत आहे. धरणाच्या खालील नदीपात्रातील रेतीघाटांवर निर्बंध लावणे अत्यावश्यक आहे. नाहीतर भविष्यात पिण्याच्या पाण्याचा भीषण संकट जनतेसमोर उभे राहिल्याशिवाय राहणार नाही. जल हे जीवन असताना याकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने जनता हैराण झाली आहे. शासनाने जनतेच्या व शेतकºयांच्या प्रश्नावर योग्य तो तोडगा काढून शेतकरी वाचला पाहिजे असे धोरण तयार करावे.
शेतकºयांच्या मनात यंदा दुष्काळाची प्रचिती होत असून मुख्य डावा कालवा असूनही रेंगाळत चालल्याने शेतीला पाणी देता येत नाही. मिळेल त्या पद्धतीने शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी धडपड करीत आहे. काही शेतकºयांनी रक्ताच्या कडेचे जेसीबी मशीनद्वारे तयार करून इंजीनच्या माध्यमातून पाणी देण्याचे खर्चिक कार्य सुरु केलेले आहे. रस्त्याच्या कडेच्या नाल्याच गायब झाल्याने पाण्याचे नियोजन होताना दिसत नाही. त्यामुळे प्रशासना गंभीर दिसून येत नाही.
शेतकरी दरवर्षी पिकविमा काढतो. मात्र काही बोटावर मोजण्याऐवढ्या लोकांनाच त्याचा लाभ मिळतो. विम्याबाबत शासनाने लावून दिलेले नियम चुकीचे असल्याची म्हणणे शेतकºयांचे आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात असलेली त्रिस्तरीय समिती कागदावरच कार्य करते की काय अशी भावना शेतकºयांमध्ये उमटत आहे. सध्या शेतकरी नैराश्येच्या गर्तेत असून इकडे आड तिकडे विहिर अशी परिस्थिती उद्भवली आहे.
 

Web Title: Farmers' agitation to save the crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.