शेतकरी हेच बँकेचे खरे मालक
By Admin | Updated: August 29, 2016 00:20 IST2016-08-29T00:20:47+5:302016-08-29T00:20:47+5:30
दि भंडारा डिस्ट्रीक्ट सेंट्रल को-आॅप बँकेचा उद्देश फक्त शेतकऱ्यांचा व सभासदांचा हित साधणे हेच आहे.

शेतकरी हेच बँकेचे खरे मालक
सुनील फुंडे यांचे प्रतिपादन : मध्यवर्ती सहकारी बँकेची आमसभा
भंडारा : दि भंडारा डिस्ट्रीक्ट सेंट्रल को-आॅप बँकेचा उद्देश फक्त शेतकऱ्यांचा व सभासदांचा हित साधणे हेच आहे. शेतकरी हेच बँकेचे मालक आहे. यामुळे शेतकरी सभासदांना निधीची कमतरता भासरणार नाही, अशी ग्वाही बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी दिली.
आॅडीट वर्ग ‘अ’ असलेल्या या बँकेची आमसभा आज लक्ष्मी सभागृहात पार पडली. यावेळी बोलतांना त्यांनी वरील ग्वाही दिली.
यावेळी अर्बन बँकेचे अध्यक्ष महेश जैन, बँकेचे ज्येष्ठ संचालक कैलाश नशिने, बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे, रामलाल चौधरी, रामराव कारेमोरे, रामदयाल पारधी, होमराज कापगते, विलास वाघाये, सत्यवान हुकरे, प्रशांत पवार, डॉ. श्रीकांत वैरागडे, वासुदेव तिरमारे, अंजिराबाई चुटे, कवलजितसिंह चढ्ढा, प्रेमसागर गणवीर, नरेंद्र बुरडे, विनायक बुरडे, योगेश हेडावू, धनंजय दलाल, जि.प. उपाध्यक्ष राजेश डोंगरे, विनयमोहन पशिने, महेंद्र गडकरी, दामाजी खंडाईत, श्रीकृष्ण पडोळे, आशिष पात्रे, दिनेश गिऱ्हेपुंजे, अभिजित वंजारी, धनराज चौधरी, नगराध्यक्ष बाबुराव बागडे, जि.प. सदस्य धनेंद्र तुरकर, अॅड. आनंदराव वंजारी, माजी आमदार अनिल बावणकर, तुमसर कृउबासचे सभापती भाऊराव तुमसरे, पवनी कउबासचे सभापती लोमेश वैद्य, माजी जि.प .सदस्य भरत खंडाईत, मनोहर सिंगनजुडे यांच्यासह इतरांची प्रमुख उपस्थिती होती.
सुनिल फुंडे पुढे म्हणाले, सन २००५ पासून बँक सतत निव्वळ नफयात आहे. चालुवर्षी बँकेला २ कोटी ८ लक्ष नफा झालेला आहे. बँकेच्या उत्पन्नावर ९ कोटी १३ लक्ष १८ हजार ९३० रुपये आयकर भरणेसाठी आयकर अधिकारी यांनी आदेश दिलेला होता. त्या आदेशाविरुध्द बँकेनी आयकर आयुक्त नागपुर यांचेकडे अपील दाखल केलेली होती. बँकेने त्या केसमध्ये बँकेच्या उत्पन्नातून बँकेच्या उत्पन्नातून ३१ मार्च २०१६ पर्यंत ५ कोटी ८० लक्ष ३ हजार ४६० रुपये भरले आहे. उर्वरित रकमेला आयकर आयुक्त यांनी माफी दिलेली आहे. त्यामुळे नफयाचे प्रमाण कमी दिसत आहे.
कुठल्याही शाखेतून ग्राहक व्यवहार व एसएमएस अलर्ट सुविधा बँकेत सुरु आहे. तसेच ए.टी.एम. नेट बँकीग सुविधा ग्राहकांना उपलब्ध करुन दिली आहे. ग्राहक बँकेच्या कुठल्याही शाखेतून पुस्तक प्रिंट करु शकतो. देवाणघेवाण करु शकतो. केंद्र शासन ग्रामीण गोदाम योजनेअंतर्गत नविन गोदाम बांधणे/दुरुस्तीसाठी कर्जवाटप करणे सुरु केले आहे. नाबार्ड पुरस्कृत १००० बचत गट स्थापन व तेवढ्याच बचत गटांना बँकेमार्फत शिक्षण देण्यात आले.
शेतकऱ्यांनी आपला स्वत:चा विकास साधण्याचे दृष्टीने शेतकरी मंडळे स्थापन करण्यास बँकेने सहकार्य केले. मुद्रा लोन, सोनेतारण, पगारतारण व पेंशनतारण कर्जाची सोय आहे. बँकेच्या १४ शाखांमधून लॉकरची सुविधा उपलब्ध असुन लवकरच सानगडी येथे लॉकर सुविधा उपलब्ध होणार आहे.
बँकेला चालु वर्षी पिक कर्ज वाटपाचे शासनाकडून दिलेले उद्दिष्ट २७० कोटीचे आहे. आतापर्यंत बँकेने २७५ कोटी, ६३ हजार ५०० सभासदांना पिककर्ज वाटप केले आहे. हे सर्व कर्ज बँकेने स्वनिधीमधूनच केले. अहवाल वर्षत बँकेचा ग्रॉस एन.पी.ए. १२.५० टक्के असून नेट एन.पी.ए. ८.८४ टक्के आहे.
नाबार्डकडून रुपे केसीसी योजनेसाठी ४६ लक्ष ८० हजार रुपये आर्थिक सहाय्य मिळाले आहे. नाबार्डने सीबी.एस. प्रकल्पासाठी ९२ लक्ष अर्थसहाय्य केले आहे. ३७१ गावामधील ५१७२ सभासदांकडील जवळपास २१ कोटी कर्जाचे रुपांतर करण्यात आले व या सभासदांना पुन्हा नव्याने कर्ज वाटप करण्यात आले. भंडारा, साकोली, पवनी, तुमसर या ठिकाणी आर्थिक साक्षरता केंद्र स्थापन करण्यात आले आहे. मोठ्या हुंडीपोटी राज्यशासनाकडून ३ कोटी ४२ लक्ष रुपये व्याजाची रक्कम घेणे आहे. तसेच पिक कर्जावरील व्याज परताव्यापोटी केंद्र शासनाकडून ७ कोटी ७६ लक्ष रुपये घेणे आहे. पिक कर्जावरील वाटपापोटी राज्य शासनाकडून व्याज परताव्यापोटी १ कोटी १४ लक्ष रुपये घेणे आहे, एकंदरीत केंद्र व राज्य शासनाकडून व्याज परताव्यापोटी १७ कोटी ८० लक्ष रुपये घेणे आह असेही सुनिल फुंडे यांनी सांगितले.