शेतकरी राज्यांतर्गत अभ्यास दौऱ्यावर

By Admin | Updated: February 23, 2016 00:27 IST2016-02-23T00:27:20+5:302016-02-23T00:27:20+5:30

बटाटा लगवड विक्री व्यवस्थापन व बटाटा प्रक्रिया याबाबत शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळून त्यांचा आत्मविश्वास वाढावा ...

Farmer State Study Tours | शेतकरी राज्यांतर्गत अभ्यास दौऱ्यावर

शेतकरी राज्यांतर्गत अभ्यास दौऱ्यावर

व्यवस्थापन मार्गदर्शन : बटाटा लागवड व विक्री प्रक्रिया
भंडारा : बटाटा लगवड विक्री व्यवस्थापन व बटाटा प्रक्रिया याबाबत शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळून त्यांचा आत्मविश्वास वाढावा व जिल्ह्यातील बटाटा लागवडीखालील क्षेत्रात वाढ व्हावी यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेमार्फत शेतकऱ्यांसाठी राज्यांतर्गत अभ्यासदौरा आयोजित करण्यात आला होता.
पुणे येथे गेलेल्या या अभ्यास दौऱ्यामध्ये पवनी तालुक्यातील सप्तरंगी फार्मस प्रोडयुसर कंपनी, विरली (खंदार) तसेच लाखांदूर व मोहाडी तालुक्यातील एकूण ४५ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी हिरवी झेंडी दाखवून शेतकऱ्यांना मार्गस्थ केले.
बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या चिप्सोना या वाणाच्या बटाटा पिकाचा करार हा सिध्दीविनायक ग्रो प्रो. कंपनी पुणे यांच्याशी करुन कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दाखविण्यात आले असून मध्ये शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये कृषि विज्ञान केंद्र, नारायणगाव, ग्रामीण आठवडी बाजार, गांधी भवन, कोथरुड, बटाटा ऐरोफोनीक लॅब, तळेगाव, कांदा व लसून संशोधन केंद्र, राजगुरु नगर, पुणे, सिध्दीविनायक प्रोसेसिंग कंपनी पुणे यांचे प्रक्रिया उद्योग केंद्र तसेच नाशिक येथील सह्याद्री व देवनांधी शेतकरी उत्पादक कंपनी आदी ठिकाणांना सहभागी शेतकरी भेट देणार आहेत.
या भेटीनंतर शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी हे मार्गदर्शन महत्वाचे ठरणार आहे. यामुळे त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होईल.
(शहर प्रतिनिधी)

Web Title: Farmer State Study Tours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.