शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
3
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
4
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
5
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
6
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
7
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
8
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
9
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
10
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
11
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
12
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
13
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
14
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
15
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
16
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
17
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
18
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
19
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
20
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?

चक्क विषाची बाटली घेऊन शेतकरी पोहोचला तहसीलवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2021 05:00 IST

काही वर्षांपासून गट नंबर १९७ अंतर्गत ०.२० हेक्टर शेतीवरून मच्छिंद्र आणि यादोराव बारसागडे, रा. चिचाळ यांच्यात वाद सुरू होता. प्रकरण न्यायालयात गेले. त्यानंतरही शेतीचा कब्जा सोडण्यास यादोराव नकार देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, २४ ऑक्टोबर रोजी यादोराव यांनी धानाची कापणी करून चोरी केल्याची तक्रार पोलिसांसह महसूल विभागाकडे करण्यात आली. मात्र, कोणतीच कार्यवाई झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या मच्छिंद्रने मंगळवारी सकाळी ११ वाजता येथील तहसील कार्यालय गाठले. त्याच्या हातात विषाची बाटली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : शेतातील धानाची एका शेतकऱ्याने बळजबरीने कापणी केल्याची तक्रार देऊनही कोणतीच कारवाई होत नसल्याने तालुक्यातील दहेगाव येथील एक शेतकरी चक्क विषाची बाटली घेऊन मंगळवारी येथील तहसील कार्यालयात पोहोचला. तत्काळ कारवाई केली नाही तर विष प्राशन करण्याचा इशारा दिला. या प्रकाराने महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली. तालुका प्रशासनाने कारवाईचे निर्देश दिल्याने मोठा अनर्थ टळला. मच्छिंद्र लक्ष्मण मेश्राम (वय ३२, रा. दहेगाव) असे शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांना तालुक्यातील खैरी येथे शासनाकडून एक हेक्टर शेती मिळाली आहे. त्यात ते धानाची लागवड करतात. मात्र, काही वर्षांपासून गट नंबर १९७ अंतर्गत ०.२० हेक्टर शेतीवरून मच्छिंद्र आणि यादोराव बारसागडे, रा. चिचाळ यांच्यात वाद सुरू होता. प्रकरण न्यायालयात गेले. त्यानंतरही शेतीचा कब्जा सोडण्यास यादोराव नकार देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.दरम्यान, २४ ऑक्टोबर रोजी यादोराव यांनी धानाची कापणी करून चोरी केल्याची तक्रार पोलिसांसह महसूल विभागाकडे करण्यात आली. मात्र, कोणतीच कार्यवाई झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या मच्छिंद्रने मंगळवारी सकाळी ११ वाजता येथील तहसील कार्यालय गाठले. त्याच्या हातात विषाची बाटली होती. संबंधितावर कारवाई केली नाही तर विष प्राशन करण्याचा इशारा दिला. हा प्रकार माहीत होताच तहसीलसमोर एकच गर्दी झाली. तहसील प्रशासनात एकच खळबळ उडाली. काही वेळातच त्याच्या हातातील विषाची बाटली हिसकावून घेण्यात आली. यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र दिवसभर या घटनेची लाखांदूर तालुक्यात चर्चा सुरू होती.

कारवाईची सूचनातहसील कार्यालयासमोर झालेल्या या प्रकारानंतर शेतकऱ्याला कार्यालयात आणण्यात आले. तेथे  तहसीलदार अखिलभारत मेश्राम, नायब तहसीलदार देविदास पाथोडे, पोलीस उपनिरीक्षक अमोल कोकाटे, पोलीस अंमलदार राहुल गायधने, भूपेंद्र बावनकुळे यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली. त्यानंतर तहसीलदार मेश्राम यांनी याप्रकरणी चौकशी करून दोषीविरोधात आवश्यक कारवाईची सूचना दिली.

 

टॅग्स :TahasildarतहसीलदारFarmerशेतकरी