विहिरीत तोल जाऊन पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:53 IST2021-02-23T04:53:47+5:302021-02-23T04:53:47+5:30
पालांदूर : शेतातील कडधान्य जमा झाल्यानंतर पिण्याच्या पाण्याकरिता शेतातल्या विहिरीत पाणी काढताना तोल गेल्याने शेतकरी विहिरीत पडला. शेतातील इतरांनी ...

विहिरीत तोल जाऊन पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू
पालांदूर : शेतातील कडधान्य जमा झाल्यानंतर पिण्याच्या पाण्याकरिता शेतातल्या विहिरीत पाणी काढताना तोल गेल्याने शेतकरी विहिरीत पडला. शेतातील इतरांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यात यश न आल्याने तो विहिरीतच मृत पावला. ही घटना सोमवारी दुपारी अडीचच्यादरम्यान डोंगरगाव/मुरमाडी तालुका लाखनी शेतशिवारात घडली. निखिल चंद्रभान मेश्राम (वय ३१, राहणार मुरमाडी तुपकर, तालुका लाखनी) असे त्याचे नाव आहे.
माहितीनुसार, हेमराज लोणारे (रा. नवेगाव (बाजार) तालुका पवनी) यांची सासूरवाडी मुरमाडी तुपकर येथील असून, सासूरवाडीला भेटीकरिता रविवारी पत्नीसह आले. रात्री संपूर्ण परिवारासह जेवण घेतले. सोमवारी सासरच्या मंडळींसोबत दुपारचेसुद्धा जेवण घेतले. त्यानंतर दुपारी एकच्यासुमारास त्यांचा साळा निखिल चंद्रभान मेश्राम, विकास मेश्राम, विश्वास तिरपुडे (राहणार पेंढरी) यांच्यासोबत शेतावर गेले. उडीद, मूग, तुळी जमा केले. यावेळी निखिल मेश्राम हा पाणी आणायला शेतातील विहिरीत गेला. पाणी काढताना त्याचा तोल गेला व विहिरीत पडला. आम्ही धावतच विहिरीच्या काठावर पोहोचलो. सोबत असलेली बकेट व दोरी विहिरीत सोडली. परंतु निखिल वर आलाच नाही. त्यामुळे सोबत असलेल्या विश्वास तिरपुडे यांनी स्वतःच्या मोटारसायकलने जाऊन गावात माहिती दिली. विहिरीत गळ टाकून निखिलला विहिरीबाहेर काढले. पालांदूर पोलिसांनी नोंद करून घेतली आहे.