शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
4
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
5
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
6
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
7
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
8
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
9
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
10
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
11
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
12
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
13
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
14
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
15
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
16
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
17
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
18
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
19
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...

शेतात पडल्या भेगा, बळीराजा चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 05:01 IST

गत तीन आठवड्यांपासून पवनी तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली नसतानाही अड्याळसह परिसरातील गावांना नेरला उपसा सिंचन संजीवनी ठरले. मात्र प्रकल्पाच्या पाण्यावर रोवणी झाली असली तरी आता शेतात भेगा दिसून येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा नेरला उपसा सिंचन पर्याय ठरणार असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे परिसरातील शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्देढग जमतात पण पाऊस बरसत नाही : नेरला उपसा सिंचन ठरणार पर्याय, पाणी सोडण्याची गरज

विशाल रणदिवे ।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : गत तीन आठवड्यांपासून पवनी तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली नसतानाही अड्याळसह परिसरातील गावांना नेरला उपसा सिंचन संजीवनी ठरले. मात्र प्रकल्पाच्या पाण्यावर रोवणी झाली असली तरी आता शेतात भेगा दिसून येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा नेरला उपसा सिंचन पर्याय ठरणार असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे परिसरातील शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.एकट्या अड्याळ आणि परिसरात पाण्याअभावी अजूनही रोवणी खोळंबलेली आहे. कुठे रोवणी करायला पाणी नाही तर कुठे भातरोप जगविण्यासाठी शेतकरी धडपडत आहे.ज्यांच्या शेतात रोवणी झाली त्या जमिनीत भेगा पडण्यास सुरुवात झाली आहे. काही दिवसांपासून विशेषत: सायंकाळच्या सुमारास ढग दाटून येतात पण बरसत नाही अशी स्थिती आहे. दुसरीकडे उन्ह - सावलीच्या खेळात उकाड्याचाही त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.नेरला उपसा सिंचन योजनेंतर्गत अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी नियोजन करीत असले तरी आताही मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी कार्यकारी अभियंता अनिल परखडे, सहाय्यक उपविभागीय अभियंता अमोल वैद्य, अजय कावळे, प्रशांत येळणे, सुनील भुरे व त्यांची चमू या कामात व्यस्त दिसून येत आहे.उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळाले असले तरी काही शेतकरी इंजीनद्वारे पऱ्ह्यांना पाणी देण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.कोरोना संकटात पाऊसही झाला लॉकडाऊनखापा : जिल्हा तलावांचा म्हणून ओळखला जात असला तरी बहुतांश शेतकऱ्याची मदार नैसर्गिक पावसावरच अवलंबून आहे. खापासह अन्य परिसरात गत आठवड्याभरापासून पाऊस न बरसल्याने वरुण राजाही लॉकडाऊन झाला काय अशी चर्चा आहे. दरम्यान बळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.जून महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामाला प्रारंभ केला होता. पेरणी केल्यानंतर अपेक्षेप्रमाणे पऱ्हेही आले. मात्र त्या दरम्यान अधून मधून पावसाच्या सरी कोसळल्यामुळे या पऱ्ह्यांना जीवनदान मिळाले होते.अवकाळी संकटाचा सामना करीत असताना पुन्हा एकदा पावसाने पाठ फिरविली आहे. दहा दिवसांपासून पाऊस न बरसल्याने पिके करपू लागली आहेत. पऱ्हे तांबूस व पिवळे दिसू लागले आहेत. बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडण्याची पुन्हा एकदा गरज झाली आहे. नाहीतर शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. परिणामी आर्थिक टंचाईलाही त्यांना सामोरे जावे लागेल.दमदार पावसाची प्रतीक्षारोवणीनंतर पुन्हा एकदा दमदार पाऊस बरसावा अशी शेतकऱ्यांची उमेद होती. मात्र आठवडाभरापेक्षा जास्त कालावधी लोटूनही पाऊस बरसलेला नाही. एकट्या उपसा सिंचनच्या भरवशावर किती दिवस धान पीक टिकवून ठेवायचे असा विचारही बळीराजा करीत आहेत. परिसरातील शेतकºयांना पुन्हा एकदा दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस