बनावट पावत्या देणाऱ्यांना अटक करा

By Admin | Updated: October 16, 2015 01:13 IST2015-10-16T01:13:47+5:302015-10-16T01:13:47+5:30

शेतकऱ्यांना काही सावकारांनी बोगस पावत्या दिल्या आहेत. काही पावत्यावर क्रमांक सुध्दा नमूद नाही.

Fake counterfeit arrests arrest | बनावट पावत्या देणाऱ्यांना अटक करा

बनावट पावत्या देणाऱ्यांना अटक करा

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : राजेंद्र पटले यांची मागणी
भंडारा : शेतकऱ्यांना काही सावकारांनी बोगस पावत्या दिल्या आहेत. काही पावत्यावर क्रमांक सुध्दा नमूद नाही. अनेकांना पावत्या सुध्दा दिल्या नाहीत. त्या पावत्या तुमच्याकडून हरवून जातील, मी त्या दागीण्यासोबत पध्दतशीर जपून ठेवतो असे सांगून शेतकऱ्यांची लुबाडणुक करण्याऱ्या सावकारांना अधिनियमा अंतर्गत अटक करण्याची मागणी शिवसेनेचे राजेंद्र पटले यांनी केली आहे.
मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तुमसर तालुक्यातील सावकारांकडून कर्ज घेतले आहे. १०-१५ किमी अंतरावर दुसरा तालुका असेल व तिथून शेतकऱ्यांनी सावकारी कर्ज घेतले असेल तर काय बिघडले, अधिनियमामध्ये असे काहीच नमूद नाही. जर सावकारांना कार्यक्षेत्र वाटून परवाना दिला असेल तर, त्या सावकाराने आपल्या परवाना अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रातच कर्ज दिले पाहिजे.
त्यांनी परवानामध्ये नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेर कर्ज दिला असेल तर तो दोष सावकारांचा आहे. शेतकऱ्यांचा नाही.
सावकार लोभात येवून परवाना क्षेत्राच्या बाहेर न सांगता कर्ज देतात, मग अशा घटना अनेक तालुक्यात घडल्या आहेत.
त्याबाबत कडक योग्य कार्यवाही व्हावी व त्या संबंधित सावकारावर शेतकऱ्यांना फसविण्याचा गुन्हा दाखल करुन अटक करण्यात यावी तसेच शेतकऱ्यांना योग्य न्याय देवून त्यांना कर्जमुक्त करुन त्यांचे दागिणे सावकाराकडून सोडवून देण्याची जबाबदारी घ्यावीत अशी पोलीस तक्रार करण्यात आलेली आहे. परंतु पोलीस योग्य तपास करण्यास टाळाटाळ करत असल्याचा तक्रारी आहेत. याकडे शासनाने कारवाई करण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Fake counterfeit arrests arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.