तुमसर-मोहाडी तालुक्यातील कारखाने बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 06:00 AM2019-12-16T06:00:00+5:302019-12-16T06:00:25+5:30

तुमसरजवळील युनिव्हर्सल फेरो मागील १५ वर्षापासून कायम बंद आहे. मोहाडी तालुक्यातील एलोरा पेपर मिल हा कारखाना दोन वर्षापूर्वी बंद पडला. वैनगंगा शुगर अँड पॉवर कारखाना, देव्हाडा बु. येथे आहे. सदर कारखाना वर्षातून पाच ते सहा महिने बंदच राहतो. सदर कारखान्यातील सुमारे ३ ते ४ हजार कामगार सध्या बेरोजगार आहेत.

Factories closed in Tumsar-Mohadi taluka | तुमसर-मोहाडी तालुक्यातील कारखाने बंद

तुमसर-मोहाडी तालुक्यातील कारखाने बंद

Next
ठळक मुद्देहजारो कामगार बेरोजगार : युनिव्हर्सल व एलोरा पेपर मिलचा समावेश

मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर व मोहाडी तालुक्यातील दोन मोठे कारखाने कायम बंद असून दोन्ही तालुक्यातील एमआयडीसीकडे उद्योगपतींनी पाठ फिरविली आहे. वीज, रस्ते, पाणी मुबलक असूनही कारखाने बंद आहेत. लोकप्रतिनिधींचे येथे कायम दुर्लक्ष हेच प्रमुख कारण दिसत आहे. नागपूर अधिवेशनात सदर गंभीर प्रश्नांची चर्चा बेरोजगारांना अपेक्षित आहे.
रेल्वेमार्ग व राष्ट्रीय तथा राज्य मार्गावर तुमसर व मोहाडी तालुके आहेत. तुमसरजवळील युनिव्हर्सल फेरो मागील १५ वर्षापासून कायम बंद आहे. मोहाडी तालुक्यातील एलोरा पेपर मिल हा कारखाना दोन वर्षापूर्वी बंद पडला. वैनगंगा शुगर अँड पॉवर कारखाना, देव्हाडा बु. येथे आहे. सदर कारखाना वर्षातून पाच ते सहा महिने बंदच राहतो. सदर कारखान्यातील सुमारे ३ ते ४ हजार कामगार सध्या बेरोजगार आहेत. तुमसर एमआयडीसीतील उद्योगधंदे बोटावर मोजण्याइतकेच सुरु आहेत.

रुग्णालयाच्या सुविधा
देव्हाडी एमआयडीसी राष्ट्रीय महामार्गावर आहे. रेल्वे स्थानकही आहे. परंतु येथे कारखाने सुरु झाले नाही. मात्र जागा बळकाविण्यात आली आहे. आजही येथे भूखंड मोठ्या प्रमाणात रिकामे आहे. त्याकडे एमआयडीसी अधिकाऱ्यांचे कायम दुर्लक्ष दिसत आहे. केवळ अहवाल मागविणे व चौकशी करण्यातच सुमारे अडीच दशकांचा कालखंड येथे वाया गेला आहे. पाणी, वीज येथे उपलब्ध असूनही उद्योगपतींनी येथे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. भाजप सेनेच्या कार्यकाळात येथील भूखंडाची चौकशी झाली होती हे विशेष. तीन वर्षपर्यंत उद्योग स्थापित न केल्यास सदर भूखंड शासनजमा करण्याचा नियम आहे.

युनिव्हर्सल कायम चर्चेत
मॅग्नीज शुद्धीकरण कारखाना मागील दीड दशकापासून कायम चर्चेत आहे. २०० कोटींचे वीज बिल सदर कारखान्यावर थकीत होते. अक्षय योजनेंतर्गत ते शासनाने माफ केले. परंतु कारखाना आजपर्यंत सुरु झाला नाही. अधिवेशनात सदर प्रकरणावर चर्चा अपेक्षित आहे. एलोरा पेपर मिल कागद निर्मिती करणारा कारखाना दोन वर्षापूर्वी बंद पडला. सुमारे ३५ वर्ष हा कारखाना सुरु होता. येथील ४५० ते ५०० कामगार बेरोजगार झाले. या संदर्भात लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची गरज आहे.

Web Title: Factories closed in Tumsar-Mohadi taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.