जिल्हा कारागृहात नेत्र तपासणी शिबिर

By Admin | Updated: July 9, 2015 00:38 IST2015-07-09T00:38:58+5:302015-07-09T00:38:58+5:30

येथील जिल्हा कारागृहात आज तथागत प्रयास बहुउद्देशिय सामाजिक महिला संस्था व सुंदरानी नेत्र चिकित्सालय,

Eye check up camp in District Jail | जिल्हा कारागृहात नेत्र तपासणी शिबिर

जिल्हा कारागृहात नेत्र तपासणी शिबिर

मार्गदर्शन : अनेकांनी घेतला लाभ
भंडारा : येथील जिल्हा कारागृहात आज तथागत प्रयास बहुउद्देशिय सामाजिक महिला संस्था व सुंदरानी नेत्र चिकित्सालय, इंद्राक्षी नेत्र चिकित्सालय भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले.
यात बंदीवानांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी कारागृह अधीक्षक जोगेंद्र मिश्रा, माजी सैनिक अनिल निमगडे, डॉ. योगेश जिभकाटे, दुर्गा दरनल, सिद्धान्त बेले, अंकित टिचकुले, वैष्णवी क्षीरसागर यांच्यासह कारागृहातील कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कैद्यांना नेत्रांची काळजी घेण्यासंदर्भात उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. संचालन व आभार प्रदर्शन वैष्णवी क्षीरसागर हिने केले. (प्रतिनिधी)

Web Title: Eye check up camp in District Jail