कर्करोगाबाबत शासनस्तरावर कमालीची अनास्था
By Admin | Updated: November 6, 2014 22:49 IST2014-11-06T22:49:52+5:302014-11-06T22:49:52+5:30
कर्करोग (कॅन्सर) हा नोटीफाईड डिसिज (ज्या आजारांची खबर शासनाला देणे आवश्यक असते असा आजार) नसल्याने शासन पातळीवर याबाबत अनास्था दिसून येत आहे. जिल्हा रुग्णालयांमध्ये

कर्करोगाबाबत शासनस्तरावर कमालीची अनास्था
भंडारा : कर्करोग (कॅन्सर) हा नोटीफाईड डिसिज (ज्या आजारांची खबर शासनाला देणे आवश्यक असते असा आजार) नसल्याने शासन पातळीवर याबाबत अनास्था दिसून येत आहे. जिल्हा रुग्णालयांमध्ये आज कॅन्सरवरील उपचार सुविधा व तज्ज्ञ या दोन्ही बाबी उपलब्ध नाहीत. परंतु सरकारी पातळीवरून किमान जी जाणीवजागृती व्हावयास हवी त्याचाही प्रचंड अभाव आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेली प्राथमिक आरोग्य केंद्र तर कॅन्सरबाबत काहीच दक्षता घेताना दिसत नाहीत.
नागरिकांना कॅन्सरविरूद्ध लढण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी जागतिक कर्करोग जागृती दिन म्हणून साजरा केला जातो. शरीर पोखरणाऱ्या या आजाराचा वेळीच शोध घेवून उपचार व्हावेत यासाठी जाीणवजागृती करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. मात्र एड्स, अंधत्व निवारण, क्षयरोग, कृष्ठरोग, साथरोग या आजारांसाठी शासन जसे राष्ट्रीय धोरण आखते मात्र राष्ट्रीय कार्यक्रमातील आजारांचे किती रुग्ण आहेत. परंतु कॅन्सरच्या रुग्णांची संख्या शासनाकडे नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयांतही प्र्राथमिक तपासनी पलिकडे कॅन्सरबाबत सुविधा नाहीत.
कॅन्सरचे जे विविध प्रकार आहेत त्यामध्ये धुम्रपानामुळे होणारे कॅन्सर व स्त्रियांमधील गर्भाशय या स्तनाचा कॅन्सर यांचे प्रमाण मोठे आहे. कॅन्सर सोसायटीच्या आकडेवारीनुसार देशात ४० टक्के कर्करोग हे तंबाखू सेवनाने होतात. मात्र धुम्रपान विरोधी सप्ताहात मौखिक तपासणी करणारी जी शिबिरे होतात कॅन्सरच्या तपासण्यांसाठी विशेष शिबिरे होत नाहीत. गर्भाशयाचा कॅन्सर तपासण्यासाठी स्त्रियांची पॅपस्मिअर ही तपासणी करावी लागते. चाळीस वर्षापुढील ज्या स्त्रीया उपचारासाठी येतील त्यांची ही तपासणी सक्तीने केली जावी, असे सांगण्यात आले आहे. मात्र या तपासणीसाठी स्त्रियांचा योनीस्त्राव घ्यावा लागत असल्याने बहुतांश स्त्रिया यातपासणीला तयारच होत नाही. (प्रतिनिधी)