गुराखी महिलेवर अतिप्रसंग
By Admin | Updated: December 7, 2014 22:45 IST2014-12-07T22:45:07+5:302014-12-07T22:45:07+5:30
शेळ्या चरावयासाठी गेलेल्या एका २८ वर्षीय विवाहितेवर ५० वर्षीय इसमाने अतिप्रसंग केला. ही घटना सुरेवाडा शेतशिवारात घडली.

गुराखी महिलेवर अतिप्रसंग
भंडारा: शेळ्या चरावयासाठी गेलेल्या एका २८ वर्षीय विवाहितेवर ५० वर्षीय इसमाने अतिप्रसंग केला. ही घटना सुरेवाडा शेतशिवारात घडली.
सुरेवाडा येथील पीडीत महिला व तो इसम हे गावातील लोकांच्या शेळ्या चराईचे काम करतात. ते कधी गावाशेजारी तर कधी जंगलालगत शेळ्या चराईसाठी नेतात. दोघेही गावातीलच असल्यामुळे त्यांची ओळख होती. दरम्यान त्यांच्यात जवळीकता वाढली होती. यातुनच २६ नोव्हेंबरला सुरेवाडा शिवारात ही महिला एकटीच असल्याची संधी साधुन या इसमाने तिच्यावर अतिप्रसंग केला.
त्यानंतर त्याने याची माहिली कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र घाबरलेल्या त्या महिलेने घडलेला प्रसंग घरी सांगितला. त्यानंतर त्या इसमाविरुद्ध कारधा पोलिसात तक्रार देण्यात आली. तक्रारीवरून पोलीस निरीक्षक राजेश शेट्टे यांनी त्या इसमाला अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपास उपनिरीक्षक एस. पी. खंडाते करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)