लोकमत न्यूज नेटवर्कगोंडउमरी : साकोली तालुक्यातील परसोडी, गोंडउमरी, महालगाव रेती घाटातून दिवसरात्र बारिक रेतीचा उपसा सुरु आहे. सडक अर्जुनी सीमेलगत असलेल्या पिपरी रेतीघाटावर ट्रॅक्टर तथा बैलबंडीच्या सहायाने रेतीची चोरी सुरु आहे. मात्र भर दिवसा रेतीचा उपसा सुरु असताना देखील याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अनेक तक्रारी करुन देखील कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही. लोकप्रतिनिधींचेही याकडे दुर्लक्ष होत आहे.वरिष्ठ अधिकारी तसेच परिसरातील तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांच्या आशिर्वादानेच रेतीचे उत्खनन होत आहे. जिल्ह्यातील रेतीला चांगली मागणी असल्याने जिल्ह्याबाहेर मोठ्या प्रमाणात रेती विक्रीसाठी पाठविली जात आहे. सर्रासपणे वाहतूक सुरु असताना परिसरातील पोलीस मात्र या वाहनांची चौकशी करताना दिसून येत नाही.प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. अनेक ट्रॅक्टरमालक स्वत: अधिकाऱ्यांशी बोलणी करुन रेतीचा उपसा करत आहेत. कोट्यावधीचा शासनाचा महसूल यामुळे बुडत आहे.कोरोनामुळे गत तीन महिन्यात सर्वत्र बंदी घालण्यात आली होती. मात्र या तीन महिन्याच्या कालखंडातील परिसरातून रेतीचा उपसा सुरुच होता. मात्र एकही अधिकारी व कर्मचारी यावर कारवाई करताना दिसून येत नाही.परिसरातून भरधाव वेगाने धावणारी वाहने नागरिकांचा जीव धोक्यात आणीत आहे. महालगाव घाटावर गत काही दिवसांपूर्वी एक ट्रॅक्टर पकडण्यात आले होते. मात्र तात्काळ महसूल विभागाने ट्रॅक्टर जमा करुन सोडून देण्यात आले होते.पिपरी शेतशिवारातून बैलबंडीच्या सहायाने मोठ्या प्रमाणात आजही उपसा सुरु आहे. पिपरी ते परसोडी रस्त्यावर सुरु असलेल्या रेतीचा वाहतूकीमुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्याची अवस्था दैयनीय झाली आहे.या रस्त्यांवर पावसाने ठिकठिकाणी पाणी साचले असून वाहनधारकांना अंदाज येत नसल्याने अपघाताची भीती वाढली आहे. याचा विपरीत परिणाम परिसरातील शेतकºयांना त्रास सहन करावा लागत आहे. सदर प्रकार गत काही दिवसांपासून सुरु असताना देखील लोकप्रतिनिधींचेही याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.रस्त्यांवर रपटा असून हा रपटा खचला आहे. पावसाळ्यात या रस्त्याने ये-जा करताना कठीण होत आहे. या सर्व प्रकार प्रशासनाला माहित असताना वरिष्ठ अधिकारी याकडे का दुर्लक्ष करीत आहे. असा सर्वसामान्यातून चर्चा होत आहे. भरधाव वाहनांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.रात्री होतो उपसा : परिसरात रेतीचा साठारात्रीच्या वेळी ट्रॅक्टरने उपसा करुन परिसरात रेतीचा साठा जमा केला जातो. त्यानंतर सकाळी ही रेती गावाबाहेर बैलबंडी तसेच ट्रॅक्टर ट्रॅलीच्या सहायाने विक्रीकरिता पाठविली जाते. गावागावातून प्रमुख रस्त्यांवरुन रेतीची वाहतूक होत असताना महसूल विभाग मात्र याकडे डोळेझाक करीत आहे.गत अनेक दिवसापासून रेतीची चोरी होत असताना कारवाइकडे दुर्लक्ष होत आहे.
चुलबंद नदीपात्रातून रेतीचा उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 05:00 IST
वरिष्ठ अधिकारी तसेच परिसरातील तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांच्या आशिर्वादानेच रेतीचे उत्खनन होत आहे. जिल्ह्यातील रेतीला चांगली मागणी असल्याने जिल्ह्याबाहेर मोठ्या प्रमाणात रेती विक्रीसाठी पाठविली जात आहे. सर्रासपणे वाहतूक सुरु असताना परिसरातील पोलीस मात्र या वाहनांची चौकशी करताना दिसून येत नाही. प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. अनेक ट्रॅक्टरमालक स्वत: अधिकाऱ्यांशी बोलणी करुन रेतीचा उपसा करत आहेत. कोट्यावधीचा शासनाचा महसूल यामुळे बुडत आहे.
चुलबंद नदीपात्रातून रेतीचा उपसा
ठळक मुद्देमहालगाव-पिपरी रेतीघाटातील प्रकार : मंडळ अधिकाऱ्यांसह तहसीलदारांचे दुर्लक्ष