यंत्राने सर्रास रेतीचे उत्खनन
By Admin | Updated: May 20, 2016 00:46 IST2016-05-20T00:46:54+5:302016-05-20T00:46:54+5:30
राज्य तथा केंद्र शासनाने वाळू उपसा, वाहतूक, पर्यावरणाचे अतिशय कडक नियमावली तयार केली.

यंत्राने सर्रास रेतीचे उत्खनन
सीमांकरणावर प्रश्नचिन्ह : तुमसर तालक्यातील प्रकार
तुमसर : राज्य तथा केंद्र शासनाने वाळू उपसा, वाहतूक, पर्यावरणाचे अतिशय कडक नियमावली तयार केली. परंतु प्रत्यक्षात ते नियम धाब्यावर बसवून वाळू उत्खनन व वाहतूक करणे सर्रास सुरु आहे. यंत्राने वाळू उपसा करण्याची पूर्व परवानगीन नसतांनी सर्रास रेती घाटावर यंत्राने वाळू उपसा करणे सुरु आहे. या प्रकरणात अर्थकारण दडल्याची शक्यता नाकारता येत नाही.
तुमसर तालुक्यासह इतर रेतीघाट प्रामुख्याने वैनगंगा ह्या नदीवरील आहेत. वैनगंगेची रेती अतिशय उच्च दर्जाची असल्याने तिला शहरात प्रचंड मागणी आहे. मागील १० ते १२ वर्षापासून वैनगंगा नदीतून प्रचंड रेतीचा उपसा करण्यात आला. तो आजही सुरुच आहे. नियमात व कायदेशिर लिलाव पद्धतीने घाट येथे घेण्यात आले. नियम येथे केवळ कागदावर दिसून येतात. महसूल विभागाने यंत्राने रेती उपसा करण्यावर बंदी घातली आहे. रेती उत्खनन सकाळी ६ ते सायंकाळी ६ या कालावधीतच करता येईल अशी अट घातलीअ ाहे.
यंत्राने रेतीचे उत्खनन करायचे असेल तर तशी परवानगी जिल्हास्तरावरून संबंधित अधिकाऱ्यांकडून घ्यावी लागते. परंतु सर्वच रेती घाटावर सर्रास यंत्रानेच शेती उत्खनन सुरु आहे.
नदीपात्रात सीमांकन व वाळू गट ठरवून दिले आहेत. खरेच नियमानुसार त्याच वाळू गटातून उत्खनन करण्यात येते का हा संशोधनाचा विषय आहे. सर्वसामान्यांना यातील काहीच कळत नाही. नदीपात्रात सीमा नेकमी कुठून सुरु होते व कुठे संपते याची माहीती कळत नाही. रेती घाटावर तसे सीमांकन केलेले दिसत नाही. काही रेती घाटांचे लिलाव झाले आहेत. परंतु अजूनपर्यंत रेती उपसा सुरु करण्यात आले नाही. हे न उलगडणारे कोडे आहे. जिल्हा खनिकर्म विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय तथा तहसील प्रशासनाचे या रेती घाटावर प्रत्यक्ष नियंत्रण आहे. रेती घाट प्रवेशाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, फ्लड लाईट व या संपूर्ण प्रकरणाची रेकॉर्डींग आवश्यक आहे. असा महसूलचा कायदा सांगतो. रेती उत्खननाचे व वाहतूकीचे नियम अतिशय कडक आहेत, परंतु त्याची प्रभावी अंमलबजावणीची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)