भंगार खरेदी दुकानात स्फोट, दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:40 IST2021-09-15T04:40:54+5:302021-09-15T04:40:54+5:30
विकास रमेश वाकडकर (३५) रा. हनुमाननगर, तुमसर असे गंभीर जखमीचे नाव आहे. तर कृष्णा बडवाईक (६५) रा. हनुमाननगर असे ...

भंगार खरेदी दुकानात स्फोट, दोन जखमी
विकास रमेश वाकडकर (३५) रा. हनुमाननगर, तुमसर असे गंभीर जखमीचे नाव आहे. तर कृष्णा बडवाईक (६५) रा. हनुमाननगर असे जखमीचे नाव आहे. येथील राजेंद्रनगरात शेखर मलेवार यांचे भंगार साहित्य खरेदीचे दुकान आहे. मंगळवारी दुपारी विकास वाकरकर दुकानात काम करत असताना एका इलेक्ट्रॉनिक वस्तूचा अचानक स्फाेट झाला. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्या हात व पायाला गंभीर जखमा झाल्या. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्त सांडले होते. स्फोटाचा आवाज ऐकून अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र विकासची प्रकृती गंभीर असल्याने त्याला भंडारा येथे उपचारासाठी पाठविण्यात आले.
घटनास्थळी तुमसरचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर, पोलीस उपनिरीक्षक विलास करंजामी यांच्यासह पोलीस कर्मचारी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला. अपघातस्थळी ग्राईंडर मशिनचे तुकडे पडले होते. नेमका स्फोट कशाचा झाला त्याचा तपास पोलीस करीत आहे.