शहरं
Join us  
Trending Stories
1
सुभेंदु अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजन दावा
2
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
3
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
4
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
5
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
6
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
7
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
8
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
9
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
10
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
11
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
12
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
13
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
14
शेअर बाजारात 'या' ५ शेअर्सचा धुमाकूळ! पाचच दिवसांत दिला ४५ ते ८० टक्क्यांपर्यंत परतावा; बघा लिस्ट
15
हंटाव्हायरस बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
16
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
17
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
18
Video - आता हे काय नवीन? "आणखी अभ्यास केला असता तर..."; लेकाला ४९९/५०० गुण मिळूनही आई नाराज
19
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
20
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
Daily Top 2Weekly Top 5

वैशालीनगरात श्रामणेर शिबिराची सांगता

By admin | Updated: July 16, 2014 00:01 IST

भारतीय बौद्ध महासभा भंडाराच्या वतीने श्रामणेर प्रशिक्षण शिबिर वैशालीनगर भंडारा येथे पार पडले. जिल्ह्यातील १४ निवडक धम्मप्रिय उपासकांना श्रामणेरची दीक्षा देण्यात आली.

भंडारा : भारतीय बौद्ध महासभा भंडाराच्या वतीने श्रामणेर प्रशिक्षण शिबिर वैशालीनगर भंडारा येथे पार पडले. जिल्ह्यातील १४ निवडक धम्मप्रिय उपासकांना श्रामणेरची दीक्षा देण्यात आली.
शिबिरात भदंत महाथेरो दीपंकर व भदंत धम्मरक्षित आणि बौद्धाचार्य आर.आर. कसबे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाची सांगता व वर्षावास आरंभ यांचा संयुक्त कार्यक्रम मंगलमय वातावरणात पार पडला.
अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष समीक्षक बौद्धप्रिय होते. प्रास्ताविक हर्षल मेश्राम यांनी केले. या कार्यक्रमाला बौद्धाचार्य आर.आर. कसबे, सी.झेड. गजभिये, वामनराव मेश्राम, एम.डब्ल्यू. दहिवले उपस्थित होते. श्रामणेर दीक्षा प्राप्त झालेले डॉ. महेंद्र रंगारी, प्राणहंस मेश्राम, चंद्रभान मेश्राम, धर्मदास गणवीर, आनंद जांभुळकर, राव लोणारे, दीपक पांडुरंग बेलेकर यांनी अनुभव कथन केले.
कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभा शाखा भंडारातर्फे आयोजित करण्यात आला होता. बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय महाउपासिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्नुषा मीरा आंबेडकर असून जिल्ह्यामध्ये २७ शाखा कार्यरत आहेत. भंते महाथेरो दिपंकर यांच्या हस्ते धम्मदीक्षेचा कार्यक्रम पार पडला. त्यात ४७३ व्यक्तींनी दीक्षा घेतली. त्याची नोंद भारतीय बौद्ध महासभेच्या रजिस्टरमध्ये घेण्यात आली.
प्रत्येक नवदीक्षित बौद्धाला १४ आॅगस्टपर्यंत भारतीय बौद्ध महासभेतर्फे प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहेत. संध्याकाळी ६ वाजता वर्षावासाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. उपासक, उपासिकांनी समस्त उपस्थितांना खीर वाटप केले.
कार्यक्रमासाठी आयोजन जिल्हाध्यक्ष समीक्षक बौद्धप्रिय तसेच समितीचे इतर सदस्यगण प्राणहंस मेश्राम, सुरेंद्र बंसोड, हर्षल मेश्राम, रुपलता फुले, हरकर उके, सुरेश रंगारी, डॉ. महेंद्र रंगारी, वीणा रामटेके, सचिन फुले, हरिचंद्र लाडे, रंजित कोल्हटकर, डॉ. मधुकर टेंभुर्णे, ममता हुमणे, सुमन कानेकर यांनी परिश्रम घेतले. संचालन प्रा.सुरेंद्र बन्सोड तर आभार प्रा. कांबळे यांनी केले. (प्रतिनिधी)