साकोलीत ३०० तरूणांनी घेतला ट्रॅकिंगचा अनुभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 23:07 IST2019-01-14T23:04:11+5:302019-01-14T23:07:36+5:30
मोबाईलमध्ये सामावलेले जग अनुभवन्यात गुंतलेल्या तरूणाईला प्रत्यक्ष निसर्गाशी नातं जोडण्याचा उपक्रम साकोली येथे पार पडला. ३०० वर तरूणांनी यात सहभागी होवून ट्रॅकिंगच्या माध्यमातून निसर्गाचा आनंद लुटला. फ्रिडम टॅलेंट अकॅडमीच्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

साकोलीत ३०० तरूणांनी घेतला ट्रॅकिंगचा अनुभव
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : मोबाईलमध्ये सामावलेले जग अनुभवन्यात गुंतलेल्या तरूणाईला प्रत्यक्ष निसर्गाशी नातं जोडण्याचा उपक्रम साकोली येथे पार पडला. ३०० वर तरूणांनी यात सहभागी होवून ट्रॅकिंगच्या माध्यमातून निसर्गाचा आनंद लुटला. फ्रिडम टॅलेंट अकॅडमीच्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून रविवारी साकोली लगतच्या महादेव पहाडीवर या ट्रॅकिंगचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक अॅड. मनिष कापगते यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला श्रीराम चौकातून सकाळी ७ वाजता प्रारंभ झाला. यात ३०० विद्यार्थी सहभागी झाले. चार कि़मी.चा प्रवास विद्यार्थ्यांनी लिलया पार केला. युवा पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी पहाडावर चढून निसर्गत अनुभवला सोबत परिसराची स्वच्छताही केली. यासोबतच वैचारिक मंथन पार पडले.
प्रगती कॉलोनीत झालेल्या उद्घाटन सोहळ्याला तहसीलदार अरविंद हिंगे, डॉ. अशोक उपाध्याय, नगराध्यक्ष धनवंता राऊत, सैय्यद मुजब्बील, तरूण मल्लानी, डॉ. चंद्रकांत निंबार्ते, परसराम फेंडारकर, उषा डोंगरवार उपस्थित होते. यशस्वितेसाठी जितेंद्र ठाकूर, शाहीद कुरैशी, फ्रिडमचे अध्यक्ष किशोर बावने, शत्रृघ्न पटले, स्वामी नेवारे, उमेश गहाणे, कार्तिक लांजेवार, राजेश गेडाम, लोकेश खुने, राहूल कावळे, विनोद मुुंगुलमारे, सागर शेंडे, निखिल कुंभारे, ऋषभ ठाकरे, शुभम मंथनवार, विक्रांत बिनेकर, तनय जैस्वाल, आशिष गुप्ता, गोलू धुर्वे, सागर कोटांगले, पी.एम. कोटांगले, पल्लवी हनवतकर, देवश्री कापगते, मिनल कन्नाके, राहूल बिसेन यांनी परिश्रम घेतले. त्यांना विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.