शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
5
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
6
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
7
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
8
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
9
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
10
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
11
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
12
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
13
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
14
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
15
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
16
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
17
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
18
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
19
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
20
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर

कंत्राटदारच करताहेत उमेदवारांचा खर्च

By admin | Updated: July 22, 2015 01:15 IST

ग्रामीण विकासाचा कणा म्हणून ओळख असलेल्या ग्रामपंचायतींना विशेष महत्व आहे.

ग्रामपंचायत निवडणूक : पदाधिकाऱ्यांचा छुप्या बैठकांवर भरकरडी (पालोरा) : ग्रामीण विकासाचा कणा म्हणून ओळख असलेल्या ग्रामपंचायतींना विशेष महत्व आहे. पंचायत राज पद्धतीमुळे ग्रामपंचायतीचे वजन वाढले तशा सर्वांच्या नजरा ग्रामपंचायत सत्ताकारणाकडे वळल्या. कामे मिळविण्यासाठी कंत्राटदारांनी पैसा ओतण्यास सुरूवात केली. करडी परिसरातील अनेक उमेदवारांना अशाच कंत्राटदारांचे पाठबळ मिळत असल्याचे दिसून येत आहे. उमेदवारांचा संपूर्ण खर्च या कंत्राटदारांकडून होत आहे. नवनियुक्त लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी सुद्धा छुप्या बैठकांना प्रारंभ केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकांतूनच राजकाराचा पाया रचला जातो. त्यामुळेच या निवडणुकीची तारीख जशी जशी जवळ येत आहे तसतसे ग्रामीण वातावरण ठवळून निघत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक लढणारे, जिंकणारे व हरणारे पुढारी सुद्धा यात सामील झाले आहेत. हरणारे बदला घेण्याची भाषा वापरित असले तरी विजयी मात्र जनाधार वाढवून ग्रामपंचायतीची सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्नरत आहेत.करडी परिसरातील देव्हाडा, जांभोरा, खडकी, पांजरा बोरी, केसलवाडा आदी गावात ग्रामपंचायत निवडणुका रंगत आहेत. मागील पाच वर्षात एकदाही नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी न भटकणारे पदाधिकारी मतदारांच्या घरी घिरट्या घालत आहे. पुन्हा एकदा संधी द्या, तुमच्या सर्व तक्रारी व अडचणी सोडविण्याची ग्वाही देण्याऱ्यांची संख्या मोठी आहे. आमच्या घरी राजकारण व राजकीय पद असावे म्हणून काहींनी सेटींग चालविली आहे. काटाकाटीचे, पाडापाडीच्या व्यूहरचना केल्या जात आहेत.राजकारण झाला व्यवसायवारंवार खोटे आश्वासने देणारी मंडळी निवडणुकीच्या रिंगणात असून एका संधीची भीक मतदारांकडे मागत आहेत. विकास कामांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी राजकारणालाच व्यवसाय केले आहे. पुढील पिढ्यांची सोय आताच झाल्याचे दिसून येते. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शासनाच्या योजना राबविल्या जातात. कामांचे कंत्राटही दिले जातात. यासंबंधातूनच राजकीय मंडळीचे नातेवाईक, स्वकीय, पैसा खर्चून कामे मिळविणारे कंत्राटदार गर्भ श्रीमंत झाले आहेत. १० वर्षापूर्वी सायकलही घरी नव्हती ते चारचाकीने फिरताहेत. सोने-चांदी-दागदागिने, शेतीवाडी, घरेदारे आदी सुखवस्तूंची रेलचेल आहे. अल्पावधीत राजकारणाच्या पाठीवर उभे राहून मोठे झालेले कंत्राटदारच आज निवडणुकांत उमेदवार व मतदारांवर करावयाचा खर्च करताहेत. मर्जीतील उमेदवार निवडून आणण्यासाठी, नावडत्यांना पाडण्यासाठी ताकत खर्ची घालत आहेत. कंत्राटदारांच्या राजकीय चुकीमुळेच अनेक गावातील कामे निकृष्ट दर्जाची, अर्धवट व कामात गैरप्रकार झाल्याचे घबाड उघडकीस येत आहेत. (वार्ताहर)