शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

अध्यक्ष, उपाध्यक्षासह संचालक निष्कासित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 05:01 IST

सदर संस्थचे अध्यक्ष व व्यवस्थापक यांनी ऑक्टोबर व नोव्हेंबर २०१९ मासिक सभेच्या ठरावाची सत्यप्रत अध्यक्ष आशा ठाकरे यांनी असे अर्ज व्यवस्थापक, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांना २८ नोव्हेंबर २०१९ केले होते. आजपावेतो संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व एका संचालिकाला विश्वासात न घेता परस्पर निष्कासीत केल्याचे दिसून आले आहे.

ठळक मुद्देलाखांदूर येथील स्वामी माधवानंद सहकारी संस्था : थकीत कर्जाचा ठपका, व्यवस्थापक व संचालकांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : येथील स्वामी माधवानंद सहकारी संस्थेचे थकीत कर्ज असल्याने संस्थेच्या व्यवस्थापक व संचालकांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष व एका संचालिकेला निष्कासित केले आहे.सदर संस्थचे अध्यक्ष व व्यवस्थापक यांनी ऑक्टोबर व नोव्हेंबर २०१९ मासिक सभेच्या ठरावाची सत्यप्रत अध्यक्ष आशा ठाकरे यांनी असे अर्ज व्यवस्थापक, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांना २८ नोव्हेंबर २०१९ केले होते. आजपावेतो संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व एका संचालिकाला विश्वासात न घेता परस्पर निष्कासीत केल्याचे दिसून आले आहे. तालुक्यातील स्वामी माधवानंद सहकारी संस्था लाखांदूर च्या अध्यक्षा आशा जागेश्वर ठाकरे यांच्या पतिकडे २३ एप्रिल २०१५ रोजी घेतलेले कर्ज १२ लक्ष रुपयांचे आहे, तर उपाध्यक्ष रजनी रामेश्वर ठाकरे यांच्या पतीचे नावे १८ जून २०१५ ला सहा लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. संचालिका संगीता हरिदास ठाकरे यांनी ९ डिसेंबर २०१३ रोजी एक लाख १५ हजार रुपयांचे कर्ज घेतले आहे. मात्र कुठल्याही प्रकारची नोटीस किंवा कर्ज मागणी संचालक व व्यवस्थापकाकडून करण्यात आलेली नाही. मात्र तीघांनाही परस्पर पदावरून पायउतार केल्याचे दिसून येत आहे.संस्थेचे नित्यनिधी अभिकर्ते यांना संस्थेतून कर्ज दिला गेला आहे. याकडे व्यवस्थापक व सहाय्यक निबंधक लक्ष देत नाही. त्याचबरोबर या संस्थेत अनेक आर.डी. एजंट नेमलले आहेत. त्यांच्यावर आजपावेतो २५ हजार रुपयांची अमानत रक्कम घेणे आहे. सध्यास्थितीत संचालक म्हणून कार्यरत असल्याचे जागेश्वर ठाकरे यांनी सांगितले. जवळपास ७० लाख रुपये इमारत बांधकामासाठी रक्कम संस्थेत जमा आहे. असलेल्या रकमेपासून संस्थेचे संचालक यांचे पती यांनी या रकमेतून २.५० लाख रुपयांची मागणी केली. संस्थेची लूट करण्याचे कारस्थान करीत असल्याची धक्कादायक माहिती संस्थेचे जागेश्वर ठाकरे यांनी माहिती दिली आहे. आशा जागेश्वर ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार २८ आॅक्टोबर २०१९ रोजी मासिक सभेचे नोटीस सहीनुसार काढण्यात आले आहे. मात्र त्या तारखेपासून दोन महिने विचारात न घेता, नोटीस न देता सभा घेण्यात आली. याबाबत विचारणा केली गेली नाही. असलेला कर्ज कधीही भरण्यास तयार आहोत. पण कोणतीही मागणी नोटीस न येता काढण्यात आले आहे.बँकेकडून थकीत कर्जदार असलेल्या संचालकांना मागणी नोटीस न देता परस्पर पदावरून निष्कासीत करण्यात आले आहे. त्याचबरोबर नव्याने रुजू झालेले अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची २३ जानेवारी निवड केल्याचे दिसून येत आहे. संस्थेत मोठा घोळ असल्याचे दिसून येत असून जिल्हा उपनिबंधक यांनी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी माजी अध्यक्ष आशा ठाकरे, माजी उपाध्यक्ष यांनी केली आहे.पाच वर्षापासून कोणतीही नोटीस अथवा आरआरसी न करता मला व माझ्या पत्नीला पदावरून निष्कासित करण्यात आले आहे. आम्ही कधीही संस्थेचे कर्ज भरण्यास तयार आहोत. याबाबत संबंधित विभागाने चौकशी करून कार्यवाही करावी.-जागेश्वर ठाकरे, माजी संचालकसंस्थेचे अभिकर्ते सुधाकर वझाडे यांनी संबंधित माहिती दिली आहे. नेमका काय प्रकार आहे, याची माहिती घेतली जाईल. संस्थेचे हित जोपासण्याचा पुरेपुर प्रयत्न केला जाईल.-भूषण काळबांधे, व्यवस्थापक.

टॅग्स :Socialसामाजिक