शिक्षण प्रक्रियेत आमूलाग्र बदल अपेक्षित

By Admin | Updated: December 26, 2015 00:45 IST2015-12-26T00:45:34+5:302015-12-26T00:45:34+5:30

आजच्या काळात केवळ एका महाविद्यालयात शिक्षणाशिवाय पर्याय नव्हता पण आजच्या विद्यार्थ्यांना खूप काही करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

Expected change in education process | शिक्षण प्रक्रियेत आमूलाग्र बदल अपेक्षित

शिक्षण प्रक्रियेत आमूलाग्र बदल अपेक्षित

नाना पटोले : कटकवार विद्यालयात वार्षिकोत्सवाचे उद्घाटन
साकोली : आजच्या काळात केवळ एका महाविद्यालयात शिक्षणाशिवाय पर्याय नव्हता पण आजच्या विद्यार्थ्यांना खूप काही करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. भविष्यकाळाचा वेध घेता शिक्षण प्रक्रियेमध्ये आमुलाग्र बदल होणार आहे, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले. कटकवार विद्यालयात वार्षिकोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी विद्या कटकवार तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. संजय पोहरकर, अंजनाबाई खुणे, मनोहर राखडे, पी.डी. मुंगमोडे, भैय्यालाल तांडे, उपस्थित होते. तत्पूर्वी ग्लोबल नेचर क्लब, प्राचार्य मस्के, स्नेहसंमेलन प्रमुख यु.टी. गायधने, विज्ञान व क्रीडा प्रदशनीचे उद्घाटन अतिथींचे परिचय व स्वागत करून स्व. कटकवार स्मृती पारितोषिक, सेवानिवृत्त प्रा. महेश उजवणे पारितोषिक तसेच राज्य, राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
खा. पटोले म्हणाले, अतिशय कठीण परिस्थितीत माजी आमदार जयंत कटकवार यांनी शाळेची सुरूवात केली. आज या विद्यालयात कला, विज्ञान व माध्यमिक शाळतून शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. निकाल १०० टक्के विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास खेळांच्या माध्यमातून राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेत आहेत. साकोली माझी कर्मभूमी आहे व त्यासाठी या भागातील गरीब, शेतकरी कुटूंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. बुद्धीचा वापर आपण कसा करतो हे आपल्यावर अवलंबून आहे.
डॉ. पोहरकर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की आयुष्यातील एक एक क्षण फार महत्वपूर्ण आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आयुष्याची लढाई लढण्याचे बळ द्यावे तर या शिक्षणाला अर्थ आहे. अंजनाताई खुणे यांनी महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर रोष व्यक्त केला. त्यांनी झाडीपट्टीच्या कविता सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरूवात झाली. संचालन शिवदास लांजेवार यांनी तर आभार बाळकृष्ण लंजे यांनी मानले.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Expected change in education process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.