अतिक्रमणाच्या विळख्यात प्रवासी निवारे

By Admin | Updated: November 18, 2016 00:37 IST2016-11-18T00:37:35+5:302016-11-18T00:37:35+5:30

तुमसर तालुक्यातील प्रवासी निवारे चक्क पांढरे हत्ती ठरले असून प्रवाशांऐवजी येथे काहींनी दुकाने थाटली आहेत.

Expatriate shelters in the know of encroachment | अतिक्रमणाच्या विळख्यात प्रवासी निवारे

अतिक्रमणाच्या विळख्यात प्रवासी निवारे

स्वच्छतेचा अभाव : निवाऱ्याकडे प्रवाशांची पाठ
तुमसर : तुमसर तालुक्यातील प्रवासी निवारे चक्क पांढरे हत्ती ठरले असून प्रवाशांऐवजी येथे काहींनी दुकाने थाटली आहेत. तर काहींनी साहित्य ठेवण्याचे गोडावून तयार केले आहे. काही प्रवाशी निवाऱ्यांत भिकाऱ्यांनी आपले निवासस्थान बनविले आहे. बसगाड्यासुद्धा या प्रवासी निवाऱ्यांपुढे उभ्या राहत नाही. सध्या प्रवाशी निवाऱ्यांची स्थिती वाईट झाली आहे.
प्रवाशांच्या सोयीकरिता विविध विकास निधीतून लाखो रुपये खर्च करून प्रवासी निवारे तयार करण्यात आले. सुरुवातीला काही महिने प्रवासी येथे थांबायचे. नंतर मात्र प्रवाशांनी प्रवाशी निवाऱ्याकडे पाठ दाखविली. या प्रवाशी निवाऱ्यांचा उपयोग सध्या दुसरेच घेताना दिसत आहेत. राज्य महामार्गावरील प्रवाशी निवाऱ्यांकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत आहे. सुमारे चार ते पाच लक्ष खर्च करून ही निवारे बांधण्यात आली होती. मात्र त्याचा उद्देश सफल झाला नाही, हे विशेष.
या प्रवाशी निवाऱ्यात काहींनी दुकाने थाटली. यात चहा दुकान तर कुठे सायकल स्टोर्सचे साहित्य कुठे ठेवलेली दिसतात. काहींनी भंगाराचे साहित्य ठेवले आहे. पशूंचे वास्तव्यही येथे दिसून येत आहे. कुठे भिकाऱ्यांचे निवासस्थान दिसून येते. प्रवाशी निवाऱ्यात बसत नाही.
उलट एखाद्या दुकानात तर कुठे झाडाखाली आश्रय घेताना दिसतात. जिथे प्रवाशी उभे राहतात तिथेच बसगाड्या थांबतात. प्रवाशी निवाऱ्यातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले आहे. स्वच्छता कुणी करावी याचे नियोजन नाही. रस्त्यालगत प्रवाशी निवारे असल्याने धुळ साचलेली आहे. प्रवाशी निवारे बांधून झाल्यानंतर त्यांच्याकडे कुणी ढुंकूनही पाहत नाही. सध्या या प्रवाशी निवाऱ्यांची स्थिती बिकट आहे.
काही प्रवाशी निवारे हे भुईसपाट होण्याच्या मार्गावर आहेत. या प्रवाशी निवाऱ्यासमोर वाहने उभी ठेवली जातात. त्यामुळे प्रवाशांना येण्या-जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Expatriate shelters in the know of encroachment