चौपदरीकरणातून होणार राज्य मार्गाचा विस्तार

By Admin | Updated: August 30, 2016 00:20 IST2016-08-30T00:20:59+5:302016-08-30T00:20:59+5:30

वाढती लोकसंख्या, वाढत्या दळणवळणाची साधने व वाढत्या अपघाताला आळा घालण्यासाठी शासनाने एकेरी रस्त्याचे दुहेरी व दुहेरी रस्त्याचे चौपदरीकरण करण्याचे ठरविले आहे.

Expansion of the state road going through four-dimensional | चौपदरीकरणातून होणार राज्य मार्गाचा विस्तार

चौपदरीकरणातून होणार राज्य मार्गाचा विस्तार

धडपड वाढली : एन.एच.ए. आय. चा सर्वेक्षण सुरु
विलास बन्सोड उसर्रा
वाढती लोकसंख्या, वाढत्या दळणवळणाची साधने व वाढत्या अपघाताला आळा घालण्यासाठी शासनाने एकेरी रस्त्याचे दुहेरी व दुहेरी रस्त्याचे चौपदरीकरण करण्याचे ठरविले आहे. त्याचाच एक भाग म्हणून रामटेक ते गोंदिया राज्य मार्ग क्र. ३३५ चे चौपदरीकरणाचे एन.एच.ए.आय. चे सर्वेक्षण सुरु झाले आहे.
वाढत्या साधन सामुग्रीमुळे जुने रस्ते अपुरे पडत आहे. यासाठी शासनाने अशा रस्त्यांना मंजुरी देण्यात आले असल्याचे बोलले जाते आहे. एनएचएआय म्हणजे नॅशनल हायवे आॅथोरिटी आॅफ इंडिया ही नामांकित कंपनीने रामटेक ते गांदिया या राज्य मार्ग क्रमांक ३३५ वर सदर रस्ता चौपदरीकरण करण्यासाठी सर्वेक्षण करायला सुरुवात केली आहे. रस्ता चौपदरीकरण व्हावा यासाठी रस्त्याच्या केंद्रबिंदू पासून २० मीटर लांब रस्ता आता चौपदरीकरण होणार आहे. येत्या काही दिवसात सर्वेक्षण पूर्ण होणार असून एन.एच.ए.आय. आपला सर्वे पी.आय.डी.सी. नोएडा ला देण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाच्या आधारावर संबंधित विभाग सदर चौपदरीकरण रस्त्याच्या अंदाजपत्रक बनवणार असे समजते.
सध्या तुमसर- रामटेक राज्यमार्गावर असलेल्या उसर्रा येथे एनएचएआय चा सर्वेक्षण सुरु आहे. सदर रस्ता चौपदरीकरण होत असून रस्त्याच्या कायापालट होणार हे सत्य आहे. पण रामटेक ते गोंदिया या राज्यमार्गावर बरेचसे गावे रस्त्यावर लागून असल्याने व त्यांच्या २० मीटर जागा रस्त्यात जाणार असल्याने नागरिकांचे घरे रस्त्यात जाणार म्हणून नागरिकांची धडपड वाढली आहे.

पुनर्वसनाचे काय?
रामटेक - गोंदिया मार्गावरील हिवरा, वासेरा, कांद्री, जांब, धोप, सालई खुर्द, उसर्रा, काटेबाम्हणी, खापा सदर गावे रस्त्यालगत आहेत. येथील बरीच घरे, जमीन सदर चौपदरीकरण रस्त्यात जाणार आहे. पण त्या घराचे पुर्नवसनाची जबाबदारी शासनाने घ्यावी असे सर्वदूर बोलले जात आहे. शासनाने सर्वेक्षण सुरु जरी केला असला तरी आतापासून नागरिकांनी सावरासावर करायला सुरुवात केली आहे. सर्वात जास्त फटका कांद्री, सालई खुर्द, धोप, उसर्रा व खापा या गावांना बसणार आहे. चौपदरीकरणातून रस्त्याचे कायापालट होईल. पण पुनर्वसनाचा प्रश्न आतापासून भेडसावू लागला आहे. रस्त्यावर काहींनी आपली उपजिवीकेसाठी लावलेली चहापान दुकानदारांचे स्वप्न भंगणार असून त्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर येईल. शासन याकडे लक्ष देईल काय?

सध्या सदर रस्ता तयार होण्यासाठी बराच वेळ लागणार आहे. रस्त्याच्या केंद्रबिंदूपासून १७५ फूट लांब असा रस्ता आहे. गावालगतच्या जागेला ही लांबी कदाचित कमी असेल. पुर्नवसनाचे काम शासनस्तरावर केले जाईल. पण सध्या वेळ आहे.
-प्रभाकर कापगते,
शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मोहाडी

Web Title: Expansion of the state road going through four-dimensional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.