‘उडान एक कदम आगे’ संस्थेचे विस्तारीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:41 IST2021-02-20T05:41:07+5:302021-02-20T05:41:07+5:30
तुमसर : शहरासह ग्रामीण भागातील युवती व महिलातील प्रतिभाना उजाळा मिळावा, यासाठी उडान एक कदम आगे या सामाजिक संस्थेचे ...

‘उडान एक कदम आगे’ संस्थेचे विस्तारीकरण
तुमसर : शहरासह ग्रामीण भागातील युवती व महिलातील प्रतिभाना उजाळा मिळावा, यासाठी उडान एक कदम आगे या सामाजिक संस्थेचे तुमसर मोहाडी तालुक्यात विस्तार करण्यात आले असून तालुक्यातील युवती व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे
महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी गत अनेक वर्षांपासून उडान एक कदम आगे या सामाजिक संस्थेतर्फे तुमसर शहरात महिलांसाठी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत, असे कार्यक्रम ग्रामीण भागातही घेतले जावे अशी ग्रामीण युवतींनी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा कल्याणी भुरे यांच्याकडे लावून धरली होती. त्यानुसार वरठी येथे संगीता सुखानी ,मोहाडी येथे रिता भाजीपाले, तुमसर शहर रंजना ठाकरे, सिहोरा येथे प्रीती बांगरे, नाकडोंगरी येथे फैमीदा शेख यांची संयोजिका म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामीण युवती व महिलांनी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून घेण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने नाव नोंदणी करून सदस्यता घ्यावे, असे आव्हान संस्थापक अध्यक्षा कल्याणी भुरे यांनी केले आहे