कुशनवर्क प्रशिक्षणला उत्स्फूर्त प्रतिसाद
By Admin | Updated: August 6, 2015 01:48 IST2015-08-06T01:48:59+5:302015-08-06T01:48:59+5:30
लोकमत सखीमंचतर्फे साकोली येथे कुशनवर्क प्रशिक्षण घेण्यात आले त्यात सखी, युवती व महिलांनी उपस्थित होत्या.

कुशनवर्क प्रशिक्षणला उत्स्फूर्त प्रतिसाद
साकोली : लोकमत सखीमंचतर्फे साकोली येथे कुशनवर्क प्रशिक्षण घेण्यात आले त्यात सखी, युवती व महिलांनी उपस्थित होत्या.
प्रशिक्षिका आशा रंगारी व शिवानी काटकर यांनी सखींना विविध प्रकारचे कुशन तयार करून दाखविले त्याते गोल, चौकोन, डमरू तसेच कुशनवर वर्क कसे करायचे याचेदेखील प्रात्यक्षिक सखींना करून दाखविले व घर सुशोभित करण्याकरिता महत्वाच्या टिप दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार तालुका विभाग प्रतिनिधी सुचिता आगाशे यांनी मानले.
कुंदा गायधने, विजू मुंगुलमारे, तृप्ती भोंगाडे, भूमिता शहारे, शगून गिऱ्हेपुंजे, मिनाक्षी आकनुरवार, दीपा करंबे, संघमित्रा मेश्राम, विनिता गायधने व शालू नंदेश्वर उपस्थित होत्या. (मंच प्रतिनिधी)
वरठी येथे विविध स्पर्धा उत्साहात
भडारा : लोकमत सखी मंच वरठी येथे हॉन्डमेड ग्रीटींग कॉमपीटीसन एक मिनीट गेम शो व भजन स्पर्धा घेण्यात आले होते. कार्यक्रमात सखी युवती व महिलांनी सहभाग नोंदविले. कार्यक्रमाची सुरवात भजन गणेश वंदना करून केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजिका सौ. संगीता सुखानी यांनी केली. कार्यक्रमाला पाहुणे म्हणून कॉम्पीटीसनमध्ये प्रथम क्रमांक सौ. वंदना वर्मा व दुसरा क्रमांक शुभांगी येळणे. तिसरा क्रमांक स्वेता येळने यांना देण्यात आले. एक मिनिट गेम शोमध्ये डायस गेममध्ये हिना पटेल प्रथम प्लेन कार्डमध्ये प्रनिता सुखानी प्रथम महिलांनी गेम खेळताना खूप आनंद घेतला. कार्यक्रमाचे आभार व्यक्त वरठीचे लायनेस अध्यक्ष रानी सिंग यांनी केले. कार्यक्रमाला सखी म्हणून, सुषमा कारेमोरे, हिना पटेल, सुजाता भाजीपाले, रेखा बावनकर, वर्षा मदनकर, प्रतिमा रहांगडाले, करण भाजीपाले, श्वेता येळणे, कविता येळणे, योगिता भाजीपाले, प्रणिता सुखानी, कविता सुखानी हे कार्यक्रमाला उपस्थित होते. (मंच प्रतिनिधी)
सखींना गोल्ड प्लेटेंड बांगड्यांचे वितरण
भंडारा : लोकमत सखी मंच सदस्य नोंदणी अभियान २०१५ च्या वार्षिक नियोजनाप्रमाणे ९ व १० आॅगस्ट रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजता दरम्यान येथील तकिया वॉर्ड स्थित साई मंगल कार्यालयात गोल्ड प्लेटेंड बांगड्याचे वितरण करण्यात येणार आहे. यात भंडारा, पवनी, साकोली, लाखनी व तुमसर तालुक्यातील नोंदणीकृत सखी सदस्य सहभागी होतील. भेटवस्तू वितरण ९ व १० आॅगस्ट या दोन दिवशीच होणार असून या व्यतिरिक्त कोणत्याही तालुक्यात, जिल्हा किंवा शहरात गोल्ड प्लेटेंड बांगड्याचे वितरण करण्यात येणार नाही. तालुक्यानुसार स्टॉल लावण्यात येईल. सखी सदस्यांना नोंदणी कार्ड आणने अनिवार्य राहील. माहितीकरिता जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार (८०८७१६२३५२) व तालुका विभाग प्रतिनिधी पवनी - अल्का भागवत ७७७४०७७२७८, साकोली - सुचिता आगाशे (८३९०७२७७१८), लाखनी - शिवानी काटकर (९७६४३९३९२६), तुमसर - रितु पशिने (८१७७९३२६१३0 यांच्याशी संपर्क साधता येईल.